शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

फाशीपासून वाचला, NIA कोर्टाने यासिन मलिकला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 6:27 PM

Yasin Malik sentenced to life imprisonment : सुनावणीदरम्यान एनआयएने (NIA) यासिन मलिकला फाशी देण्याची मागणी केली होती.मात्र, फाशीऐवजी मलिकला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 

नवी दिल्ली : दहशतवाद्यांना पैसा पुरविल्याप्रकरणी काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासीन मलिक याला दिल्लीतील विशेष न्यायालयाने दोषी ठरविले आहे. त्याला द्यावयाच्या शिक्षेसंदर्भात युक्तिवाद २५ मे रोजी म्हणजेच आज न्यायालयात पार पडला आहे. बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्यान्वये यासीन मलिकवर गुन्हे दाखल करून त्याच्यावर हा खटला चालविण्यात आला. आता दोन्ही पक्षाचा युक्तिवाद पार पडल्यानंतर यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच १० लाख रुपये दंड भरण्यास कोर्टाने सांगितलं आहे. 

दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने (NIA Court ) यासिन मलिकच्या शिक्षेच्या कालावधीवर आज सुनावणी पूर्ण केली. आता यासिन मलिकच्या शिक्षेवर न्यायालयाने निकाल दिला आहे. सुनावणीदरम्यान एनआयएने (NIA) यासिन मलिकला फाशी देण्याची मागणी केली होती.मात्र, फाशीऐवजी मलिकला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 

यासीनला कडक बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. यासीन मलिकला गेल्या सुनावणीत न्यायालयाने दोषी ठरवले होते आणि यासिनने दहशतवादासाठी वित्तपुरवठा प्रकरणी सर्व आरोप स्वीकारले होते. यात बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा (UAPA) अंतर्गत आरोपांचा समावेश आहे. 19 मे रोजी पटियाला हाऊस न्यायालयाचे विशेष न्यायाधीश प्रवीण सिंग यांनी मलिकला दोषी ठरवले होते. 

यासीनने सर्व आरोप मान्य केले होतेजम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख मलिक यांने त्याच्यावर लावलेल्या आरोपांना विरोध केला नाही. आरोपांमध्ये UAPA ची कलम 16 (दहशतवादी कृत्ये), 17 (दहशतवादी कृत्यांसाठी निधी गोळा करणे), 18 (दहशतवादी कट रचणे) आणि 20 (दहशतवादी टोळी किंवा संघटनेचा सदस्य असणे), भारतीय दंड 120-बी(गुन्हेगारी कट) आणि 124-A (देशद्रोह) ही कलमे लावली आहेत. जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट ही UAPA अंतर्गत प्रतिबंधित दहशतवादी संघटना आहे.

यासीन व्यतिरिक्त कोण दोषी?न्यायालयाने यापूर्वी फारुख अहमद दार उर्फ ​​बिट्टा कराटे, शाबीर शाह, मसरत आलम, मोहम्मद युसुफ शाह, आफताब अहमद शाह, अल्ताफ अहमद शाह, नईम खान, मोहम्मद अकबर खांडे, राजा मेहराजुद्दीन कलवाल, बशीर अहमद भट, जहूर अहमद शाह वताली, फरार अहमद शाह, फरार अहमद शाह यांना अटक केली होती. शब्बीर अहमद शाह, अब्दुल रशीद शेख आणि नवलकिशोर कपूर यांच्यासह काश्मिरी फुटीरतावादी नेत्यांवर औपचारिकपणे आरोप निश्चित करण्यात आले आहेत.

कोण यासिन मलिक?

यासिन मलिकचा जन्म 3 एप्रिल 1966 रोजी श्रीनगरमधील मैसुमा येथे झाला. यासीनचे वडील गुलाम कादिर मलिक हे सरकारी बस चालक होते. यासीनचे संपूर्ण शिक्षण श्रीनगरमध्ये झाले. त्याने श्री प्रताप महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले आहे. यासीन मलिकने जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट या प्रतिबंधित संघटनेचा प्रमुख बनण्यापर्यंतची गोष्ट एका मुलाखतीत सांगितली होती. त्यात त्याने दावा केला होता की, काश्मीरमध्ये लष्कराचे अत्याचार पाहून आपण शस्त्र उचलले. यासीनने 80 च्या दशकात 'ताला पार्टी' स्थापन केली होती, ज्याद्वारे त्याने काश्मीर खोऱ्यात अनेक दहशतवादी घटना घडवून आणल्या. 

1986 मध्ये मलिकने 'ताला पार्टी'चे नाव बदलून 'इस्लामिक स्टुडंट्स लीग' (ISL) केले. यामध्ये तो फक्त काश्मीरमधील तरुणांचा समावेश करायचा. काश्मीरला भारतापासून वेगळे करणे हा त्याचा उद्देश होता. काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी घटना घडवून आणणाऱ्या अशफाक मजीद वानी, जावेद मीर आणि अब्दुल हमीद शेख या दहशतवाद्यांचा आयएसएलमध्ये समावेश होता. 

1988 मध्ये जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट (JKLF) मध्ये सामील झाल्यानंतर काही दिवसांनी तो पाकिस्तानला गेला. येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर 1989 मध्ये भारतात परतला. यानंतर त्याने गैर-मुस्लिमांना मारण्यास सुरुवात केली. 8 डिसेंबर 1989 रोजी देशाचे तत्कालीन गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबिया सईद हिचे अपहरण करण्यात आले होते.

टॅग्स :TerrorismदहशतवादJammu Kashmirजम्मू-काश्मीरCourtन्यायालयLife Imprisonmentजन्मठेप