Yamuna Expressway News: दाट धुक्यांमुळे मुथरेत यमुना एक्स्प्रेसवेवर थरकाप उडवणारी घटना घडली. सात बस आणि ३ कार अशी दहा वाहने एकमेकांना धडकली. अपघातानंतर वाहनांनी पेट घेतला. आगीमध्ये काही वाहनांचा सांगाडाच शिल्लक राहिला. या घटनेत चार प्रवाशांचा जळून मृत्यू झाला.
मंगळवारी भल्या पहाटे प्रवाशी साखरझोपेत असतानाच ही घटना घडली. यात जखमींचा आकडाही मोठा असून, दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने हा विचित्र अपघात घडल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, अग्निशामक दल, बचाव पथके अपघातस्थळी दाखल झाले होते.
अपघातानंतर बसेसना लागली आग
मुथराचे पोलीस अधीक्षक श्लोक कुमार यांनी सांगितले की, दाट धुक्यामुळे भल्या पहाटे सात बसेस आणि अनेक कार एकमेकांना धडकल्या. अपघातानंतर चारपेक्षा जास्त बसेसनी पेट घेतला. यात अनेक प्रवाशी होरपळून जखमी झाले आहेत.
अपघातानंतरचे व्हिडीओ थरकाप उडवणारे
यमुना एक्स्प्रेसवेवर झालेल्या अनेक वाहनांच्या अपघाताचे व्हिडीओही सोसल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यात पेट घेतलेल्या बसेस दिसत आहेत.
एका जखमी व्यक्तीने सांगितले की, अपघात झाल्यानंतर बसला आग लागली. जेव्हा अपघात झाला, तेव्हा सगळे प्रवाशी झोपेत होते. सकाळी चार वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.
पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, या अपघातात २५ पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले असून, बहुतांश जखमींची प्रकृती स्थिर आहे.
चार जणांचा जळून मृत्यू झाला असून, त्यापैकी दोघांची ओळख पटली आहे. ज्यांचा मृत्यू झाला आहे, ते मऊ, आझमगढ या जिल्ह्यातून असून, दिल्लीकडे जात होते.
Web Summary : A major accident on the Yamuna Expressway near Mathura involving multiple buses and cars resulted in a fire, tragically killing four passengers. Dense fog caused low visibility led to the collision. Injured individuals were promptly hospitalized, and authorities are investigating the incident.
Web Summary : मथुरा के पास यमुना एक्सप्रेसवे पर कई बसों और कारों की टक्कर में आग लगने से चार यात्रियों की दर्दनाक मौत हो गई। घने कोहरे के कारण कम दृश्यता के कारण यह टक्कर हुई। घायलों को तुरंत अस्पताल में भर्ती कराया गया, और अधिकारी घटना की जांच कर रहे हैं।