नवी दिल्ली : चीनची काही वर्षांतच स्वस्त स्मार्टफोनमुळे प्रसिद्ध झालेली कंपनी Xiaomi आता खरेच हवा करणार आहे. भारतीयांच्या हातात स्थान मिळविलेल्या शाओमीने आता खिशात मावेल एवढा Mi Portable Electric Air Compressor भारतात लाँच केला आहे. या कंपनीने स्मार्टफोनव्यतिरिक्त स्पोर्ट शूज, एअर प्युरिफायर, स्मार्ट लाईट सारखी उत्पादने बाजारात आणली आहेत.
एमआयच्या या पोर्टेबल इलेक्ट्रीक एअर कॉम्प्रेसरने कोणत्याही वाहनाच्या टायरमध्ये कुठेही हवा भरता येणार आहे. हा पंप चीन आणि युरोपच्या बाजारात आधीच उतरविण्यात आला आहे. शाओमीच्या या एअर पंपाच्या मदतीने बाईकपासून कारपर्यंत कोणत्याही वाहनाच्या टायरमध्ये हवा भरता येणार आहे. महत्वाचे म्हमजे हा पंप बिल्ट इन लिथिअम बॅटरीसह येतो. यामुळे वाहनचालक याला कुठेही घेऊन जाऊ शकतात. सध्या बाजारात उपलब्ध असलेले एअर पंप हे काहीसे मोठे आणि वीजेचे कनेक्शन हवे असलेले आहेत. यामुळे कारच्या कनेक्टरला ते जोडावे लागतात. मात्र, शाओमीचा हा पंप वायरलेस आहे.
किंमत किती? Xiaomi ने या कॉम्प्रेसरची किंमत 2299 रुपये ठेवली आहे. याची खरी किंमत 3499 आहे. शाओमीच्या अधिकृत वेबसाईटवरच हा पंप मिळणार आहे. 10 ऑगस्टपासून याची विक्री केली जाईल. 10 दिवसांत 4000 युनिट विकण्यात येणार आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
'वर्क फ्रॉम होम' काळात SBI चा मोठा निर्णय; तब्बल 1000 कोटी रुपये वाचणार
काँग्रेसने हटविले, सचिन पायलटांना लगेचच भाजपची खुली ऑफर
रेखा यांचा कोरोना चाचणीस नकार; मुंबई महापालिकेच्या पथकाला दरवाजाही उघडला नाही
क्रूरतेचा कळस! चीनने गलवानमध्ये मृत सैनिकांचे बलिदान नाकारले; अंत्यसंस्कारास नकार
OnePlus Nord चे फिचर्स लीक; स्वस्त फोनमध्ये 6 कॅमेऱ्यांचा सेटअप आणि बरेच काही
सॅमसंगची फ्रिजवर ऑफर! 38 हजारांचा स्मार्टफोन मोफत; 9 हजारांचा कॅशबॅकही
शूट टू किल! एक गोळी दुश्मन खल्लास; जवानांना मिळणार खतरनाक अमेरिकी रायफल
कोरोना पाठ सोडेना! बरा होतोय पण दोन महिन्यांनंतर दिसताहेत ही गंभीर लक्षणे