कुस्तीपटू विनेश फोगाट आहे मंथरा; भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे वादग्रस्त उद्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 06:00 IST2023-05-24T06:00:18+5:302023-05-24T06:00:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : कुस्तीपटू विनेश फोगाट या मंथरा आहेत. रामायणामध्ये मंथरा, कैकयी या ज्याप्रमाणे वागल्या, त्याचप्रमाणे ...

Wrestler Vinesh Phogat is Manthara; Controversial statement of BJP MP Brijbhushan Sharan Singh | कुस्तीपटू विनेश फोगाट आहे मंथरा; भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे वादग्रस्त उद्गार

कुस्तीपटू विनेश फोगाट आहे मंथरा; भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे वादग्रस्त उद्गार

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कुस्तीपटू विनेश फोगाट या मंथरा आहेत. रामायणामध्ये मंथरा, कैकयी या ज्याप्रमाणे वागल्या, त्याचप्रमाणे विनेश या मंथरा बनून माझ्याशी वागत आहेत, अशी टीका भाजपचे खासदार  ब्रिजभूषण शरण सिंह यांनी केली आहे. 

 ते म्हणाले की, मंथरा, कैकयी या वाईट वागल्या. त्यामुळे सारे सत्य जगासमोर आले होते. विनेश फोगाट यांनी केलेल्या आरोपांमागची वस्तुस्थिती जगासमोर लवकरच येईल. माझ्याविरोधात कारस्थान रचण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. यापूर्वीही खेळाडूंनी पदके परत करण्याचा निर्णय जाहीर केल्यावर सिंह यांनी पदके कशाला परत करता, बक्षिसाची रक्कम परत करा, अशी खोचक टीका केली होती. 

कुस्तीगिरांनी काढला मोर्चा : ब्रिजभूषण शरण सिंह यांना अटक करावी ही मागणी मान्य होत नसल्याच्या निषेधार्थ कुस्तीगिरांनी मंगळवारी इंडिया गेटपर्यंत एक मोर्चा काढला. त्यात कुस्तीगीर व त्यांचे हजारो समर्थक हातात तिरंगा ध्वज घेऊन सामील झाले होते. आमच्या मोर्चामध्ये जनतेने सामील होऊ नये म्हणून पोलिसांनी प्रयत्न केले, असा आरोप कुस्तीगिरांनी केला. 

Web Title: Wrestler Vinesh Phogat is Manthara; Controversial statement of BJP MP Brijbhushan Sharan Singh