मुंबई : टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांना भारतरत्न द्या; असा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होत असला तरी रतन टाटा यांनी हे कॅॅम्पेन थांबविण्यात यावे, अशी विनंती करून पुन्हा एकदा आपल्या साधेपणाचा प्रत्यय दिला.सातत्याने करत असलेल्या समाजसेवेमुळे रतन टाटा नेहमीच चर्चेत असतात. त्यांना पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. आता त्यांना भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी सोशल मीडियावर होत आहे. मोटिव्हेशन स्पीकर डॉ. विवेक बिंद्रा यांनी सर्वप्रथम ही मागणी केली. यानंतर रतन टाटा यांना भारतरत्न देण्यात यावा, असा हॅशटॅग ट्रेंड झाला. यावर ट्वीटरवर प्रतिक्रिया देताना रतन टाटा म्हणाले की, मला भारतरत्न मिळावा यासाठी सोशल मीडियावर तुम्ही दाखविलेल्या भावनांचा मी आदर करतो. माझी आपल्यालाविनंती आहे की, ही मोहीम थांबवावी. मी स्वत:ला भाग्यवान समजतो आणि देशाच्या प्रगतीसाठी मी माझे योगदान कायम देत राहीन.
टाटांना भारतरत्न देण्यासाठी मोहीम सुरू झाली; टाटांच्या नम्रपणानं मनं जिंकली; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 07:21 IST