शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

चिंताजनक!युद्धाशिवायच भारतीय लष्कराला दरवर्षी गमावावे लागताहेत 1600 जवान 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2017 8:02 AM

 पाकिस्तानकडून सीमेवर सातत्याने सुरू असणारी आगळीक, काश्मीरसारख्या अशांत प्रदेशातील दहशतवादी कारवाया यामुळे भारतीय लष्करातील जवानांना नेहम प्राण तळहातावर ठेवून कर्तव्य बजावावे लागते. दरम्यान, भारतीय लष्कराला दरवर्षी युद्धाशिवायच सुमारे 1600 जवानांना गमवावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

नवी दिल्ली -  पाकिस्तानकडून सीमेवर सातत्याने सुरू असणारी आगळीक, काश्मीरसारख्या अशांत प्रदेशातील दहशतवादी कारवाया यामुळे भारतीय लष्करातील जवानांना नेहम प्राण तळहातावर ठेवून कर्तव्य बजावावे लागते. दरम्यान, भारतीय लष्कराला दरवर्षी युद्धाशिवायच सुमारे 1600 जवानांना गमवावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यापैकी सर्वाधिक जवानांचा मृत्यू हा रस्ते अपघात आणि आत्महत्यांमुळे होत आहे. हा आकडा काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये गमवाव्या लागणाऱ्या जवानांच्या संख्येपेक्षा अधिक आहे. 

 जवानांच्या अशा पद्धतीने होणाऱ्या मृत्युमुळे लष्करासमोरील चिंता वाढली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त प्रकाशित केले असून, या वृत्तामधील आकडेवारीमधूम हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या आकडेवारीनुसार दरवर्षी 350 जवान, नौसैनिक आणि हवाई दलाचे जवान रस्ते अपघातांमध्ये आपला जीव गमावतात. तर दरवर्षी सुमारे 120 जवान आत्महत्या करत आहेत. भारतात रस्ते अपघात आणि आत्महत्येमुळे मृत्यू होणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. मात्र कठोर प्रशिक्षण आणि शिस्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या भारतीय लष्कराच्या जवानांचे अशाप्रकारे होत असलेले मृत्यू चिंताजनक आहेत. 2014 पासून लष्कर, नौदल आणि हवाई दलाने आपले सुमारे 6 हजार 500 जवान गमावले आहेत. सुमारे 11 लाख 73 हजार एवढी सैनिक संख्या असलेल्या भारतीय सैन्य दलांसाठी हा एक मोठा आकडा आहे. जवानांच्या अशाप्रकारे होणाऱ्या मृत्युंमुळे हवाई दल आणि नौदलाच्या मनुष्यबळामध्ये मोठी घट होत आहे. लष्करामध्ये युद्धात वीरमरण येणाऱ्या जवानांपेक्षा 12 पट अधिक जवान हे शारीरिक दुखापतींचे बळी ठरत आहेत. आकडेवारीनुसार 2016 मध्ये सीमारेषेवर होणारा गोळीबार आणि दहशतवादी कारवायांमध्ये 112 जवानांना वीरमरण आले होते. मात्र याच काळात सुमारे 1 हजार 480 जवान अपघात, आत्महत्या आणि इतर कारणांमुळे मृत्युमुखी पडले. यावर्षीसुद्धा सुमारे 80 जवानांना वीरमरण आले आहे. तर एक हजार 60 जवानांना अपघात, आत्महत्या आणि  इतर कारणांमुळे जीव गमवावा लागला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी याबाबत गेल्या महिन्यात चिंता व्यक्त केली होती. कारण  अपघात, आत्महत्या आणि इतर कारणांमुळे लष्कराला दरवर्षी सुमारे दोन बटालियन गमवाव्या लागत आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, लष्करप्रमुखांनी याविषयी वेळीच लक्ष देण्यास सांगितले आहे.  नोकरीच्या दबावामुळे होणारे मृत्यू जसे की आत्महत्या किंवा सहकारी  आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची होणारी हत्या अशा कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडाही मोठा आहे.  जम्मू-काश्मीर आणि पूर्वोत्तर राज्यात चालवण्यात येत असलेल्या दहशतवाद विरोधी मोहिमांमधील दीर्घकाळ सहभागामुळे जवानांवर दबाव असतो. त्याशिवाय जवानांना मिळणारे कमी वेतन, सुट्ट्या, इतर सुविधांची कमतरता यामुळेही जवान तणावाखाली असतात. या समस्या सोडवण्यासाठी जवानांचे समुपदेशन, कुटुंबासोबत राहण्याची परवानगी, सुट्ट्या मिळण्याची सुविधा आणि तक्रारींचे त्वरित निवारण्याची सुविधा देऊन जवानांच्या स्थितीत सुधारणा करता येईल.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानIndiaभारतDeathमृत्यूindian navyभारतीय नौदलairforceहवाईदल