शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक! हवा प्रदूषणामुळे भारतात होतोय दर आठमधील एक मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 11:48 IST

भारतात होणाऱ्या दर आठ मृत्यूंपैकी एक मृत्यू हा हवा प्रदूषणामुळे होत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष एका अहवालामधून समोर आला आहे. 

ठळक मुद्देप्रचंड वृक्षतोड, औद्योगिकीकरण आणि वाहनांची मोठ्या प्रमाणात वाढलेली संख्या यामुळे गेल्या काही वर्षांत भारतातील वायू प्रदूषण वाढले आहे भारतात होणाऱ्या दर आठ मृत्यूंपैकी एक मृत्यू हा वायू प्रदूषणामुळे होत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष एका अहवालामधून समोर आला आहे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमएमआर) ने  प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये हा दावा करण्यात आला आहे

नवी दिल्ली - प्रचंड वृक्षतोड, औद्योगिकीकरण आणि वाहनांची मोठ्या प्रमाणात वाढलेली संख्या यामुळे गेल्या काही वर्षांत भारतातील वायू प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे भारतात होणाऱ्या दर आठ मृत्यूंपैकी एक मृत्यू हा हवा प्रदूषणामुळे होत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष एका अहवालामधून समोर आला आहे.  इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमएमआर) ने  प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये हा दावा करण्यात आला आहे. अशा प्रकारचा संशोधन होण्याची होण्याची भारतातील ही पहिलीच वेळ असून, यामध्ये प्रदूषित हवेमुळे होणारे मृत्यू आणि प्रदूषणाचा आजार आणि आयुर्मानावर होणारा परिणाम यांचा अभ्यास करण्यात आला आहे. प्रदूषणामुळे भारतातील लोकांचे सरासरी  आयुर्मान घटत असून, शुद्ध हवा मिळाली असती तर यापैकी अनेकांचे आयुर्मान हे एक वर्ष सात महिन्यांनी वाढले असते, असा निष्कर्ष या अहवालातून काढण्यात आला आहे. भारतातील 77 टक्के लोकसंख्या वायू प्रदूषणाच्या विळख्यात असून, हे प्रदूषण तंबाखूपासून असलेल्या धोक्यापेक्षा अधिक धोकादायक ठरत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.  तंबाखूचे कोणत्याही स्वरूपातील सेवन हे आरोग्यासाठी हानीकारक असते. त्यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका उदभवतो. मात्र नव्या अभ्यासानुसार तंबाखूमुळे असलेल्या आजारांच्या धोक्यापेक्षा  प्रदूषणामुळे निर्माण होणारा आजारपणांचा धोका अधिक आहे. तसेच गतवर्षी 2017 मध्ये भारतात 17.4 लाख लोकांच्या मृत्यूसाठी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात वायू प्रदूषण जबाबदार असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अभ्यासानुसार, लोअर रेस्पिरेटरी इन्फ्लेक्शनची तुलना केल्यास ही तंबाखूपेक्षा वायू प्रदूषणामुळे होत आहे. केवळ फुफ्फुसाचा कर्करोग हा तंबाखूमुळे अधिक होत आहे. प्रति एक लाख व्यक्तींमागे 49 जणांना वायू प्रदूषणामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होत आहे. तर तंबाखूमुळे  62 जणांना फुफ्फुसाचा कर्करोग होत आहे.  तसेच वायूप्रदूषणामुळे गर्भतापाचा धोकाही वाढला असल्याचे अमेरिकेतील यूटा विद्यापीठाच्या संशोधनातून समोर आले आहे.  

टॅग्स :pollutionप्रदूषणIndiaभारतHealthआरोग्य