शासनाच्या अनुदानाशिवाय विश्व साहित्य संमेलन (२)
By Admin | Updated: July 31, 2015 23:03 IST2015-07-31T23:03:26+5:302015-07-31T23:03:26+5:30
ना. धो. महानोर यांचे कथित पत्र मिळाले नाही

शासनाच्या अनुदानाशिवाय विश्व साहित्य संमेलन (२)
न . धो. महानोर यांचे कथित पत्र मिळाले नाहीज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांच्याशी आपले अतिशय जवळचे स्नेहबंध आहेत. चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे ते नियोजित अध्यक्ष होते. जोहान्सबर्गचे संमेलन रद्द झाले. त्यानंतर अंदमानला हे संमेलन घेण्यात येत आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती त्यांना केली पण दुष्काळी स्थितीमुळे शेती उजाड झाली. शेतीशी ते अतिशय प्रामाणिकपणे जुळले आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा, वेदना अनुभवताना या संमेलनाचे अध्यक्षपद आपण स्वीकारू शकत नाही, असे त्यांनी नम्रपणे महामंडळाला कळविले. त्यात संमेलन रद्द करण्याचा उल्लेख नाही तर शेजवलकरांच्या पत्रात दुष्काळी स्थितीचा उल्लेखही नाही. पुण्यातील प्रस्तावित निवडणुका पाहता संमेलनाचा उपयोग निवडून येण्यासाठी कुणी करू नये म्हणून त्यांनी पुणे मसापला पत्र पाठविले. हे पत्र महामंडळाच्या बैठकीत वाचले जावे, ही त्यांची इच्छा आम्ही पूर्ण केली. या पत्राबाबत बरेच उलटसुलट वाद होत आहेत पण त्यात तथ्य नाही, असे माधवी वैद्य म्हणाल्या. याप्रसंगी शुभदा फडणवीस, वामन तेलंग प्रामुख्याने उपस्थित होते.