पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांची एकजूट आवश्यक
By Admin | Updated: February 16, 2015 23:55 IST2015-02-16T23:55:20+5:302015-02-16T23:55:20+5:30
पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांची एकजूट आवश्यक

पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांची एकजूट आवश्यक
प रोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांची एकजूट आवश्यक निषेध सभा : कार्यकर्त्यांचा एकसूर नागपूर : प्रतिगामी शक्तींना पुरोगामी विचार नको आहेत. अलीकडे पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांवरील हल्ले वाढले आहे. चळवळीत काम करणाऱ्या लोकांमध्ये दहशत पसरवण्याचा हा प्रयत्न आहे. अशा परिस्थितीत पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या सर्व सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने याचा निषेध करणे आवश्यक आहे. तेव्हा प्रतिगामी लोकांविरुद्ध लढण्यासाठी पुरोगामी लोकांची एकजूट व्हावी, असा सूर विचारवंत व ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंदराव पानसरे व त्यांच्या पत्नीवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्ह आयोजित निषेध सभेत निघाला. शहरातील पुरोगामी विचारांच्या चळवळीत काम करणाऱ्या विविध संघटनांच्यावतीने अमृत भवनस्थित राष्ट्रभाषा समितीच्या सभागृहात सोमवारी निषेध सभा घेण्यात आली. विचारवंत डॉ. सुरेश खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या सभेत ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. यशवंत मनोहर, उमेश चौबे, डॉ. भाऊ लोखंडे, जम्मू आनंद, अरुणा सबाने, उज्ज्वला तुपसुंदरे, सोमा सेन, माया चवरे, डॉ. प्रमोद मुनघाटे, प्रभू राजगडकर, प्रफुल्ल शिलेदार, रमेश बोरकुटे आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.