आज सायंकाळी सुर्यास्तानंतर आकाशात एक अद्भूत नजारा दिसला. हा योग तब्बल ८०० वर्षांनी जुळून आला होता. सूर्यमालेतील सर्वात मोठाग्रह गुरु आणि शनि एकमेकांच्या अगदी जवळ आले होते.
नैऋत्य दिशेला हे दोन ग्रह अशा कोणात आले होते की ते एकमेकांना भेटले असेच वाटत होते. हा योगायोग मकर राशीमध्ये होत आहे. लाखो लोकांनी या दोन ग्रहांचे मिलन उघड्या डोळ्यांनी पाहिले. तसेच अनेक ठिकाणी दुर्बिनीच्या साह्यानेही हा नजारा अनुभवण्यात आला. जानेवारीमध्ये मकर राशीमध्ये शनी प्रवेश करणार आहे. नोव्हेंबरमध्ये गुरु ग्रह मकर राशीमध्ये आला आहे.
पृथ्वीवरून अगदी ०.१ डिग्री अंतरावर दोन्ही ग्रहांना एकाचवेळी निरीक्षण व अभ्यासण्याची संधी मिळाली आहे. वीस वर्षांपूर्वी हे परस्परांचे जवळ आले होते. शनि सुमारे १२ डिग्री आणि गुरु ३० डिग्रीपर्वत पृथ्वीवरील वर्षात प्रवास करणार आहे. याचा अर्थ असा की प्रत्येक वर्षी १८ डिग्री जवळ येतील आणि जवळ येण्यास २० वर्षे लागतील शनि आणि गुरूमधील अंतर ७३० दशलक्ष दिवस किलोमीटर आहे. शेवटच्या वेळी म्हणजेच २८ मे २००० रोजी हे अंतर १.२५ डिग्री होते.
कन्झिकेशन्स म्हणजे काय ? कन्झिकेशन्स म्हणजे जेव्हा दोन वस्तू आकाशात एकमेकाच्या जवळ दिसतात. गुरु आणि शनि यांचा एक कन्झिकेशन्स- दर २० वर्षांतून एकदाच घडले- याला एक ग्रेट कन्झिकेशन्स म्हणतात.