पत्नीच्या माहेरच्या संपत्तीवर माहेरच्यांचाच अधिकार! या कंडीशनमध्ये पतीचा कोणताही अधिकार नाही; आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचा मोठा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 14:13 IST2026-03-31T14:11:09+5:302026-03-31T14:13:28+5:30

Women's Property Inheritance Rights: आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने हिंदू उत्तराधिकार कायद्याच्या कलम 15(2)(a) नुसार मोठा निकाल दिला आहे. अपत्यहीन हिंदू महिलेला पालकांकडून मिळालेल्या मालमत्तेवर पतीचा अधिकार नसेल. वाचा सविस्तर बातमी.

Women's Property Inheritance Rights: The wife's maternal uncle has the right over her maternal uncle's property! The husband has no right in this condition; Andhra Pradesh High Court's big verdict | पत्नीच्या माहेरच्या संपत्तीवर माहेरच्यांचाच अधिकार! या कंडीशनमध्ये पतीचा कोणताही अधिकार नाही; आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचा मोठा निकाल

पत्नीच्या माहेरच्या संपत्तीवर माहेरच्यांचाच अधिकार! या कंडीशनमध्ये पतीचा कोणताही अधिकार नाही; आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचा मोठा निकाल

हिंदू उत्तराधिकार कायद्याबाबत आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा निकाल दिला आहे. जर एखाद्या हिंदू महिलेला तिच्या आई-वडिलांकडून वारसाहक्काने मालमत्ता मिळाली असेल आणि तिचा मृत्यू मृत्यूपत्र न करता झाला, तर त्या मालमत्तेवर तिच्या पतीचा किंवा सासरच्या मंडळींचा कोणताही कायदेशीर अधिकार राहणार नाही. अशी मालमत्ता थेट महिलेच्या वडिलांच्या वारसांकडे जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

न्यायमूर्ती तरलादा राजशेखर राव यांनी हिंदू उत्तराधिकार अधिनियम, १९५६ च्या कलम १५(२)(अ) चा आधार घेत हा निकाल दिला. न्यायालयाने म्हटले की, "कायद्यातील तरतूद स्पष्ट आहे. जर एखाद्या हिंदू महिलेला तिच्या पालकांकडून मालमत्ता मिळाली असेल आणि तिला स्वतःची मुले नसतील, तर तिच्या मृत्यूनंतर ती मालमत्ता पतीला न मिळता तिच्या वडिलांच्या कायदेशीर वारसांकडे हस्तांतरित होईल."

प्रकरण नेमके काय होते?
हे संपूर्ण प्रकरण एका मालमत्तेच्या वादातून सुरू झाले होते. 

२००२: एका आजीने आपल्या मालमत्तेचा एक हिस्सा आपल्या पहिल्या नातीला भेट म्हणून दिला होता.

२००५: या पहिल्या नातीचा (मालमत्ताधारक) कोणत्याही अपत्याशिवाय मृत्यू झाला.

२०१२: नातीच्या मृत्यूनंतर, आजीने ते 'गिफ्ट डीड' रद्द केले आणि मृत्यूपत्राद्वारे ती मालमत्ता आपल्या दुसऱ्या नातीच्या (याचिकाकर्ता) नावे केली.

वाद: पहिल्या नातीच्या पतीने यावर आक्षेप घेतला आणि महसूल विभागाने त्याच्या बाजूने निकाल दिला होता.

न्यायालयाने रद्द केला 'संयुक्त कलेक्टर'चा आदेश
याचिकाकर्त्याने (दुसरी नात) या वादाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यांनी असा युक्तिवाद केला की, हिंदू उत्तराधिकार कायद्याच्या कलम १५(२)(अ) नुसार, त्यांच्या बहिणीच्या निधनानंतर तिच्या पतीला (प्रतिवादी ५) मालमत्तेत कोणताही अधिकार उरला नाही. कारण ती मालमत्ता तिला तिच्या आजीकडून (वडिलांच्या रक्ताच्या नात्यातून) मिळाली होती.

न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य केला आणि स्पष्ट केले की, मृत पत्नीला मिळालेल्या माहेरच्या संपत्तीवर पती मालकी हक्क सांगू शकत नाही. त्यामुळे, आजीने केलेले फेरबदल आणि त्यानंतर झालेली वसीयत कायदेशीररित्या वैध ठरवण्यात आली.

महत्त्वाचा कायदेशीर मुद्दा
हा निकाल त्या सर्व प्रकरणांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे जिथे महिलांना त्यांच्या माहेरून मोठी संपत्ती मिळते. अपत्यहीन महिलांच्या बाबतीत मालमत्ता सासरच्या वारसांकडे जाण्याऐवजी पुन्हा माहेरच्या कुटुंबाकडे (वडिलांच्या वारसांकडे) कशी वळवली जाते, याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.

Web Title : पत्नी की पैतृक संपत्ति पर मायके का अधिकार; पति का कोई अधिकार नहीं

Web Summary : आंध्र प्रदेश उच्च न्यायालय का फैसला: पत्नी की विरासत में मिली संपत्ति पर पति का अधिकार नहीं। संपत्ति उसके पिता के वारिसों को जाएगी। अदालत ने कहा कि महिला की संपत्ति पर ससुराल वालों का कोई अधिकार नहीं है।

Web Title : Wife's Parental Property Belongs to Her Family; Husband Has No Right

Web Summary : Andhra Pradesh HC ruled husband has no right on wife's inherited property if she dies intestate. Property goes to her father's heirs, not in-laws. The ruling clarifies inheritance laws for women with parental property and no children.