शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

'PM मोदींना 10 वर्षे वाट पाहण्याची काय गरज होती?' महिला आरक्षणावरुन सिब्बलांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 1:46 PM

Kapil Sibal News: महिला आरक्षण विधेयक बुधवारी संसदेत सादर होण्याची चर्चा आहे. यावरुन राजकारण सुरू झाले आहे.

Women Reservation Bill News: संसदेचे विशेष अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात महिलाआरक्षणाला मंजुरी देण्याबाबत चर्चा सुरू आहे. यावरुन राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सरकारला धारेवर धरले आहे. सर्व पक्ष विधेयकाच्या समर्थनात होते, तर 10 वर्षे वाट पाहण्याची काय गरज होती? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 2024 मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याचे सिब्बल यांचे म्हणणे आहे. महिलाआरक्षण विधेयक बुधवारी संसदेत मांडले जाण्याची शक्यता आहे.

केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी सोमवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करुन मंत्रिमंडळाने महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी दिल्याची माहिती दिली. मात्र, तासाभरात त्यांनी ही पोस्ट डिलीट केली. सोमवारी सायंकाळी 90 मिनिटे चाललेल्या मंत्रिमंडळ बैठकीबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र केंद्रीय मंत्रिमंडळाने महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी दिल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

काय म्हणाले सिब्बल?काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी म्हटले की, महिला आरक्षण विधेयकाला सर्व पक्ष समर्थन करत असताना पंतप्रधान मोदींनी हे विधेयक मांडण्यासाठी 10 वर्षे का वाट पाहिली? 2024 हे त्याचे कारण असेल. पण जर सरकारने ओबीसी महिलांना कोटा दिला नाही तर 2024 मध्ये भाजपचा यूपीमध्येही पराभव होऊ शकतो. 

काय आहे महिला आरक्षण विधेयक?महिला आरक्षण विधेयक एक घटनादुरुस्ती विधेयक आहे, जे भारतातील लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षणाची तरतूद करते. हे विधेयक 1996 मध्ये पहिल्यांदा मांडण्यात आले होते, मात्र ते आजतागायत मंजूर झालेले नाही. भारतीय राजकारणात महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देणे, हा महिला आरक्षण विधेयकाचा उद्देश आहे. भारतात 2023 मध्ये लोकसभेतील महिलांचा सहभाग केवळ 14.5% आहे, जो जगातील सर्वात कमी आहे. महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यामुळे महिलांचे प्रतिनिधित्व वाढेल आणि त्या धोरणनिर्मितीत अधिक प्रभावी भूमिका बजावू शकतील, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :kapil sibalकपिल सिब्बलWomenमहिलाreservationआरक्षणlok sabhaलोकसभाPoliticsराजकारण