शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

स्वेच्छेने एकत्र राहताना बिनसल्यास बलात्काराची तक्रार करता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 05:44 IST

एखाद्या पुरुषाबरोबर स्वेच्छेने राहाणाऱ्या तसेच संबंध प्रस्थापित केलेल्या महिलेला त्या दोघांच्यात बिनसल्यानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करता येणार नाही, असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

नवी दिल्ली : एखाद्या पुरुषाबरोबर स्वेच्छेने राहाणाऱ्या तसेच संबंध प्रस्थापित केलेल्या महिलेला त्या दोघांच्यात बिनसल्यानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करता येणार नाही, असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. हेमंत गुप्ता, न्या. विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने एका बलात्कार प्रकरणातील आरोपी अन्सार मोहम्मद याला गुरुवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्याने एका महिलेवर बलात्कार केल्याचा तसेच तिला धमकाविल्याचा आरोप आहे.

खंडपीठाने म्हटले आहे की, तक्रारदार महिला या प्रकरणातील आरोपीबरोबर स्वेच्छेने राहात होती. त्या दोघांमध्ये संबंध प्रस्थापित झाले होते. पण आता दोघांच्यात बिनसल्यावर या महिलेने बलात्काराची केलेली तक्रार अयोग्य आहे. तिला तशी तक्रार करता येणार नाही. या प्रकरणातील आरोपी अन्सार मोहम्मद याला राजस्थान उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नामंजूर केला होता. तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बाजूला ठेवला. 

आरोपीबरोबर मी चार वर्षे राहात होते, त्याच्यासोबत संबंध प्रस्थापित झाले होते हे तक्रारदार महिलेने मान्य केले आहे. त्या दोघांनी एकत्र राहाण्यास सुरूवात केली त्यावेळी या महिलेचे वय २१ वर्षांचे होते. या प्रकरणात देण्यात आलेला आदेश हा आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यापुरताच मर्यादित आहे. त्यामुळे या आदेशाचा बलात्कार प्रकरणातील तपासावर काहीही परिणाम होणार नाही. तो तपास पुढे सुरू ठेवण्यात यावा.      सर्वोच्च न्यायालय

हा तर गंभीर गुन्हा : राजस्थान न्यायालय

  • राजस्थान उच्च न्यायालयाने आपल्या १९ मे रोजी दिलेल्या निकालात म्हटले होते की, पीडित महिलेशी विवाह करेन असे आश्वासन आरोपी अन्सार मोहम्मद याने तिला दिले व फसवणूक केली. त्या दोघांमध्ये प्रस्थापित झालेल्या संबंधातून या महिलेला एक मूल झाले. 
  • या सर्व घटना व गुन्ह्याचे गंभीर स्वरुप लक्षात घेता अन्सारला अटकपूर्व जामीन देता येणार नाही.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयrelationshipरिलेशनशिपRajasthanराजस्थान