'महिलांवरील बलात्कारास त्यांचे सौंदर्यच कारणीभूत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 09:02 IST2026-01-18T09:02:00+5:302026-01-18T09:02:10+5:30

मध्य प्रदेशातील काँग्रेस आमदार फूलसिंह बरैया यांचे वक्तव्य

Women beauty is the reason for rape against them says Congress MLA Phool Singh Baraiya | 'महिलांवरील बलात्कारास त्यांचे सौंदर्यच कारणीभूत'

'महिलांवरील बलात्कारास त्यांचे सौंदर्यच कारणीभूत'

भोपाळ : मध्य प्रदेशातील काँग्रेस आमदार फूलसिंह बरैया यांनी महिलांबाबत वाद‌ग्रस्त वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. 'स्त्रीयांच्या सौंदर्यामुळेच त्यांच्यावर बलात्कार होतात', असे विधान करत त्यांनी सौंदर्याचा संबंध थेट गुन्ह्याशी जोडला. इतकेच नव्हे तर, दलित, आदिवासी आणि मागासवर्गीय महिलांवरील अत्याचारांना धार्मिक ग्रंथातील 'तीर्थफळ' ही संकल्पना कारणीभूत असल्याचा अजब दावाही त्यांनी केला.

दतिया जिल्ह्यातील भांडेरचे आमदार असलेले बरैया हे बसपतून काँग्रेसमध्ये आले आहेत. ते बसपचे मध्य प्रदेशचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी एका मुलाखतीत हे वक्तव्य केले. त्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

भाजपने धरले धारेवर

बरैया यांच्या या विधानावरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून, काँग्रेसला धारेवर धरले आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या विधानाचा तीव्र निषेध केला असून, 'राहुल गांधी यांनी बरैया यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे. 'ही विकृत मानसिकतेची लक्षणे आहेत,' अशी टीका भाजपने केली आहे

Web Title : कांग्रेस विधायक: महिलाओं का सौंदर्य बलात्कार का कारण; आक्रोश

Web Summary : कांग्रेस विधायक फूलसिंह बरैया के चौंकाने वाले बयान में महिलाओं की सुंदरता को बलात्कार से जोड़ा गया, जिससे राजनीतिक हंगामा मच गया। बीजेपी ने उनकी बर्खास्तगी की मांग की, उनकी प्रतिगामी मानसिकता की निंदा की और कांग्रेस नेता राहुल गांधी से जवाबदेही की मांग की।

Web Title : Congress MLA: Women's beauty causes rape; sparks outrage.

Web Summary : Congress MLA ফুলসিংহ বরैया's shocking statement links women's beauty to rape, triggering political uproar. BJP demands his expulsion, condemning his regressive mindset and demanding accountability from Congress leader Rahul Gandhi.