उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथील एका गावात महिलेचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही अंतर गेल्यावर महिलेने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर शेतात काम करणारे लोक घटनास्थळी धावून आले. गावकऱ्यांना पाहून आरोपी महिलेला रस्त्याच्या कडेला सोडून पळून गेले. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, फिरोजाबादच्या नरखी पोलीस स्टेशन परिसरात राहणारी एक महिला रिक्षाने तिच्या गावी परतत होती. महिलेने सांगितले की, परिसरातील ५ जणांनी कारमधून तिचा पाठलाग केला. थोडे अंतर गेल्यावर, कोटला रोडजवळील बरतारा चौकात त्यांनी रिक्षा थांबवून महिलेला जबरदस्तीने त्यांच्या कारमध्ये बसवले आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिलेने आरडाओरडा करायला सुरुवात केली. आवाज ऐकून शेतात काम करणारे लोक बाहेर आले. गावकऱ्यांना पाहून ते सर्वजण महिलेला रस्त्यावर सोडून पळून गेले.
आरोपींच्या तावडीतून सुटलेल्या महिलेने तात्काळ तिच्या पतीला घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पती तात्काळ घटनास्थळी पोहोचला आणि पोलिसही पोहोचले. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
आरोपींची ओळख पटली असून कन्हिलाल, देवदत्त, भूपेंद्र, शिवम आणि जितेंद्र अशी त्यांची नावे आहेत. आरोपी पीडिताच्या गावातील रहिवासी आहेत. पीडितेने भूपेंद्रने तिचे कपडे फाडल्याचा आणि कन्हिलाल आणि देवदत्तवर तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले.