आश्रमात कोंडून महिलेवर दोन वर्षे बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 09:11 IST2018-11-02T09:10:49+5:302018-11-02T09:11:08+5:30

उपचाराच्या नावाखाली अमित बाबाशी भेट घालवून दिली.

woman raped for two years in the ashram | आश्रमात कोंडून महिलेवर दोन वर्षे बलात्कार

आश्रमात कोंडून महिलेवर दोन वर्षे बलात्कार

नवी दिल्ली : गोरखपूरच्या एका आश्रमातून पलायन करून दिल्लीला पोहोचलेल्या महिलेने महिला आयोगाकडे धाव घेतली आहे. अमित बाबा मजार वालाने आपल्याला दोन वर्षांपासून बंदी बनवत आश्रमात कोंडून वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. याबाबत पोलिसांत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. 


हा अमित बाबा गोरखपूरच्या परमेश्वरपूरमध्ये आश्रम चालवितो. पिडीत महिला दोन वर्षांपूर्वी एका कामासाठी कुटुंबासोबत गोरखपूरला गेली होती. तिथे तिला एका फॅक्टरीमध्ये काम मिळाले. यावेळी तिला एक महिला भेटली. तिने उपचाराच्या नावाखाली अमित बाबाशी भेट घालवून दिली. या महिलेवर विश्वास ठेवून पिडीता बाबाला भेटली. पिडीतेला त्याने औषध दिले. हे औषध खाल्ल्यानंतर तिला मळमळायला लागले. कशीतरी ती घरी पोहोचली. यामुळे तिने बाबाला फोन करून याची माहिती दिली. त्यावेळी तिला बाबाने पुन्हा आश्रमात बोलावले. 


यानंतर बाबाने या पिडीतेला आश्रमात कोंडले आणि दोन वर्षे बलात्कार केला. या बाबाने राजकीय ओळखींचा हवाला देऊन महिलेला कोणाला सांगितल्यास तिच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकीही दिली होती. या महिलेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पकडली गेल्याने बाबाने आणि त्याच्या अनुयायांनी मारहाण केली. अखेर एका व्यक्तीने तिला पळून जाण्यास मदत केल्याचे या पिडीतेने सांगितले. 
 

Web Title: woman raped for two years in the ashram