Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 11:09 IST2025-10-30T11:09:33+5:302025-10-30T11:09:58+5:30
सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका महिला एसी कोचमध्ये खिडकीची काच फोडताना दिसत आहे.

Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका महिला एसी कोचमध्ये खिडकीची काच फोडताना दिसत आहे. रेल्वे प्रवासादरम्यान तिची पर्स चोरीला गेल्याचं म्हटलं जात आहे. पोलीस आणि रेल्वे कर्मचाऱ्यांकडून मदत न मिळाल्याने संतप्त झालेल्या महिलेने "मला माझी पर्स परत आणून द्या" म्हणत खिडकीची काच फोडली. व्हिडिओमध्ये महिलेचा राग पाहायला मिळत आहे.
एसी कोचमधील इतर प्रवासी तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतात, पण ती कोणाचंही ऐकत नाही. काच फुटल्यानंतर काचेचे तुकडे सीटवर उडाले. प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या लोकांना हे दृश्य पाहून धक्का बसतो. याच दरम्यान एक लहान मूल देखील महिलेच्या शेजारी बसलेलं दिसतं. या मुलावर काय परिणाम होईल याची आता लोकांना चिंता वाटत आहे.
कल इंदौर से दिल्ली जाने वाली ट्रेन में एक महिला का पर्स चोरी हो जाता है,
— Pramod Yadav (@PRAMODRAO278121) October 29, 2025
फिर वह RPF वालों से मदद मांगती है और RPF उसकी पर्स ढूंढने में कोई मदद नहीं करती है,उसके बाद महिला गुस्से में विंडो का कांच तोड़ने लगती है,
महिला को रेलवे के कर्मचारी रोकते रहते हैं लेकिन महिला नहीं रुकती… pic.twitter.com/Oi9lCjm8Bt
रिपोर्टनुसार, प्रवासादरम्यान महिलेची पर्स चोरीला गेली. रेल्वे कर्मचाऱ्यांकडून किंवा अधिकाऱ्यांकडून तिला कोणतीही मदत न मिळाल्याने तिने रागाच्या भरात खिडकीची काच फोडली. @PRAMODRAO278121 नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हायरल व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्याला आतापर्यंत १ लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
"इंदोरहून दिल्लीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये एका महिलेची पर्स चोरीला गेली आहे. ती रेल्वे सुरक्षा दलाकडे (RPF) मदत मागते, परंतु RPF तिला ते शोधण्यात मदत करत नाही. त्यानंतर ती महिला चिडते आणि रागाच्या भरात एसी कोचमधील खिडकीची काच फोडू लागते. रेल्वे कर्मचारी आणि प्रवासी तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण ती थांबत नाही" असं व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, RPF दिल्ली विभागाने प्रतिक्रिया देत म्हटलं की, "हे ट्विट चुकीचं आहे. ती एक मानसिकदृष्ट्या विकलांग महिला आहे जिला RPF ने ताब्यात घेतलं आणि पुढील कारवाईसाठी GRP नवी दिल्लीकडे सोपवलं. तिची पर्स हरवल्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे. यावर आता युजर्स सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.