बलात्कारापासून वाचण्यासाठी महिलेने इमारतीवरून मारली उडी, आरोपी हॉटेल मालक अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 14:24 IST2025-02-05T14:24:32+5:302025-02-05T14:24:52+5:30
Kerala Crime News: केरळमधील कोजिकोडे येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका हॉटेल मालकाला बलात्काराचा प्रयत्न केल्या प्रकरणी त्रिशूर जिल्ह्यामधून अटक करण्यात आली आहे. आरोपीची ओळख देवदास अशी पटली असून, त्याला मंगळवारी रात्री एका बस मधून प्रवास करत असताना कुन्नमकुलम येथून अटक करण्यात आली.

बलात्कारापासून वाचण्यासाठी महिलेने इमारतीवरून मारली उडी, आरोपी हॉटेल मालक अटकेत
केरळमधील कोजिकोडे येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका हॉटेल मालकाला बलात्काराचा प्रयत्न केल्या प्रकरणी त्रिशूर जिल्ह्यामधून अटक करण्यात आली आहे. आरोपीची ओळख देवदास अशी पटली असून, त्याला मंगळवारी रात्री एका बस मधून प्रवास करत असताना कुन्नमकुलम येथून अटक करण्यात आली.
हॉटेल मालक असलेल्या देवदास याने लैंगिक शोषणाचा प्रयत्न केल्याने त्याच्याच हॉटेलमध्ये कर्मचारी असलेल्या महिलेने इमातरीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारली होती. त्यात ही महिला गंभीर जखमी झाली होती. गंभीर जखमी अवस्थेत या महिलेने केलेला आरडा ओरडा ऐकून आजूबाजूचे लोक तिथे गोळा झाले आणि त्यांनी या महिलेला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर या महिलेने पोलिसांकडे धाव घेतल्याने हे प्रकरण उघडकीस आलं होतं.
या महिलेने पोलिसांकडे दिलेल्या जबाबात सांगितले की, मी फोनवर व्हिडीओ गेम पाहत असताना अचानक तिघेजण माझ्या खोलीत घुसले. त्यांच्यापासून बचावासाठी इमारतीवरून खाली उडी मारण्यासाशिवाय माझ्याकडे इतर कुठलाही पर्याय नव्हता. या घटनेनंतर आरोपी देवदास हा फरार झाला होता. दरम्यान, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या हालचालींवर लक्ष ठेववलं होतं. तसेच पोलिसांचं एक पथक त्यांच्या मागावर होतं. अखेर प्रवासात असताना वाटेतच या आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या. त्यानंतर आज पहाटे त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. महिलेचं लैंगिक शोषण करताना आरोपी देवदाससोबत त्याचे यास आणि सुरेश हे त्याचे दोन सहकारी होते. हे दोघेही सध्या फरार आहेत. त्यांना पकडण्यासाठी छापेमारी सुरू आहे.