शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दोन मुलांची आई असलेली महिला शिपाई पडली इन्स्पेक्टरच्या प्रेमात, पतीने केली तक्रार, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 16:47 IST

Extra Marital Affair: बिहारमधील कटिहार येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका व्यक्तीने त्याच्या पोलीस शिपाई असलेल्या पत्नीचे पोलीस इन्स्पेक्टरसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला आहे.

बिहारमधील कटिहार येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका व्यक्तीने त्याच्या पोलीस शिपाई असलेल्या पत्नीचे पोलीस इन्स्पेक्टरसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी या व्यक्तीने कटिहारच्या पोलीस अधीक्षकांना एक निवेदन दिले आहे. तसेच कारवाईची मागणी केली आहे. तक्रारकर्त्या पतीचा पाच वर्षांपूर्वी पोलीस शिपाई असलेल्या तरुणीसोबत विवाह झाला होता. त्यांना दोन मुलेही आहेत. आता या प्रकरणी पोलीस अधीक्षकांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार कटिहार जिल्ह्यातील कोढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या महिला शिपायाचा पती धीरज कुमार सिंह हा खासगी नोकरी करतो. त्याने आरोप केला की, त्याची पत्नी कोलासी पोलीस चौकीच्या डायल ११२ नंबर पोलीस गाडीवर शिपाई म्हणून तैनात आहे. तिचे कोलासी पोलीस चौकीचे प्रभारी विकास कुमार याच्याशी विवाहबाह्य संबंध आहेत. तसेच त्याचे अनेक पुरावे आपल्याकडे आहेत, असा दावाही त्याने केला आहे.

पोलीस अधीक्षकांना दिलेल्या अर्जामध्ये धीरज याने सांगितले की, मला माझ्या पत्नीच्या मोबाईलमध्ये इन्स्टाग्राममध्ये पोलीस चौकीचे प्रभारी विकास कुमार याच्याशी केलेलं अश्लील चॅट मिळालं आहे. तसेच पत्नी आता माझ्याशी व्यवस्थित बोलतही नाही. संधी मिळेल तेव्हा मला दरडावत राहते. तसेच आपल्या मर्जीप्रमाणे वागते, असी तक्रार त्याने केली.

मात्र पतीने केलेल्या आरोपांवर पोलीस शिपाई असलेली पत्नी खुशबू प्रिया हिने अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच ती काही दिवस सुट्टीवर असल्याचे समोर येत आहे. दरम्यान, या प्रकरणी कोलासी पोलीस चौकीतील प्रभारी विकास कुमार याचीही कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. याबाबत कटिहारचे पोलीस अधिक्षक जितेंद्र कुमार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच चौकशी पूर्ण झाल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे.  

टॅग्स :BiharबिहारPoliceपोलिसFamilyपरिवारrelationshipरिलेशनशिप