woman beaten and molested by drunken person in balaghat video goes viral | महिलेची छेड काढणं पडलं महागात; झाडाला बांधून गावकऱ्यांच्या मदतीने केली यथेच्छ धुलाई

महिलेची छेड काढणं पडलं महागात; झाडाला बांधून गावकऱ्यांच्या मदतीने केली यथेच्छ धुलाई

बालाघाट - महिलेची छेड काढणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. दारूच्या नशेत घरात घुसून त्याने महिलेची छेड काढली पण महिलेने त्याला चांगलीच अद्दल घडवली आहे. छेड काढणाऱ्या व्यक्तीला एका झाडाला बांधलं आणि गावकऱ्यांच्या मदतीने त्यांची यथेच्छ धुलाई केली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला असून सर्वांनी महिलेचं आणि स्त्री शक्तीचं भरभरून कौतुक केलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातील अचनाकपूर गावात एक व्यक्ती रात्री दारूच्या नशेत एका घरात घुसला. त्या घरात महिला एकटीच होती. महिलेला एकटं पाहून तो तिची छेड काढू लागला. महिलेने आरडाओरडा सुरू केला. गोंधळ ऐकून अनेक जण जमा झाले.  लोक जमा होताच दारुच्या नशेत असलेला व्यक्ती घाबरला आणि तिथून तो पळू लागला. पण तो पळून जाण्यात अपयशी ठरला. 

गावकऱ्यांनी त्याला पकडलं. तसेच महिलेने गावकऱ्यांच्या मदतीने त्याला बांधलं आणि त्याची यथेच्छ धुलाई केली. यानंतर पोलिसांना बोलवण्यात आलं. पोलिसांनी त्या व्यक्तीला आपल्या ताब्यात घेतलं. मात्र ही संपूर्ण घटना घडत असताना काही लोकांनी याचा व्हिडीओ तयार केला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील सामूहिक बलात्कार प्रकरणाने देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र याच दरम्यान बलात्काराच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक घटना तेलंगणाच्या निजामाबादमध्ये घडली. एका 15 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप करत लोकांनी एका ढोंगी साधूला चांगलाच चोप दिला आहे. 

ढोंगी साधूचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, स्थानिकांनी धू-धू धुतलं

साधुने मानसिक आजारांवर उपचार करण्याच्या बहाण्याने मुलींवर अत्याचार केला आहे. पीडित मुलीच्या आई-वडिलांनीच तिला या साधुकडे नेलं होतं. ढोंगी साधूने आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत मुलीवर यशस्वी उपचार करण्याचं आश्वासन मुलीच्या पालकांना दिलं. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन महिन्यांपासून हा ढोंगी साधू पीडित मुलीवर उपचाराच्या नावावर लैंगिक अत्याचार करत होता. एक दिवस अचानक मुलीच्या पोटात दुखू लागलं आणि त्यामुळे तिला रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. ढोंगी साधू मुलीला दुसऱ्या रुममध्ये नेऊन नशेचे पदार्थ देत होता. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. या धक्कादायक घटनेची माहिती मिळाल्यानंतर काही महिला कार्यकर्ते आणि स्थानिक लोक आरोपीच्या घरी पोहचले आणि त्याला चांगलाच चोप दिला. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: woman beaten and molested by drunken person in balaghat video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.