शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

धोरणातील प्रस्तावित बदल मागे घ्या, व्हॉट्सॲपला केंद्राचे खरमरीत पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 1:06 AM

केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने व्हॉट्सॲपचे मुख्य कार्यकारी अधिकारी विल कॅथकार्ट यांना पत्र लिहून त्यांच्या धोरणबदलाच्या निर्णयासंदर्भात खडसावले आहे.

नवी दिल्ली : व्यक्तिगतता धोरणाच्या (प्रायव्हसी पॉलिसी) प्रस्तावित बदलांमुळे युझर्सची नाराजी ओढवून घेतलेल्या व्हॉट्सॲपला आता केंद्र सरकारनेही जाब विचारला. धोरणबदलाचा एकतर्फी निर्णय अन्यायकारक आणि अस्वीकारार्ह असून धोरण तातडीने मागे घेण्यात यावे, अशा आशयाचे खरमरीत पत्र केंद्राने व्हॉट्सॲपला लिहिले आहे. केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने व्हॉट्सॲपचे मुख्य कार्यकारी अधिकारी विल कॅथकार्ट यांना पत्र लिहून त्यांच्या धोरणबदलाच्या निर्णयासंदर्भात खडसावले आहे. भारतात व्हॉट्सॲपचे सर्वाधिक वापरकर्ते असून त्यांच्या संमतीविनाच व्हॉट्सॲपने आपल्या सेवा शर्ती आणि व्यक्तिगतता धोरणासंदर्भातील बदल प्रस्तावित करणे म्हणजे भारतीय नागरिकांच्या निवड स्वातंत्र्याविषयी चिंतित होण्यासारखे असल्याचे मंत्रालयाने आपल्या पत्रात नमूद केले आहे. पत्रातील इतर मुद्दे पुढीलप्रमाणे : -    भारतीयांच्या व्यक्तिगततेचा आदर केला जाणे महत्त्वाचे  -    धोरणबदलामुळे ४० कोटी वापरकर्त्यांचा डेटा धोक्यात येण्याची शक्यता  -    त्याचा घातक परिणाम उद्भवू शकतो-    भारतात पुरविल्या जाणाऱ्या सेवांविषयी व्हॉट्सॲपने तपशीलवार माहिती द्यावी-    संकलित केल्या जाणाऱ्या डेटाचे पृथक्करण कसे केले जाते. त्यासंदर्भात वापरकर्त्यांच्या परवानग्या आणि संमती कशी प्राप्त केली जाते याची माहिती सादर केली जावी-    वापरकर्त्यांच्या एकंदर व्हॉट्सॲप वापरावर त्यांचा डेटा संकलित केला जातो का, याचाही तपशील द्यावा-    भारत तसेच इतर देशांतील व्यक्तिगतता धोरण यात काय फरक आहे याचा सविस्तर तपशील सादर केला जावा-    डेटा आणि माहिती यांची सुरक्षा, व्यक्तिगतता तसेच गोपनीयता यासंदर्भातील धोरणाचे स्पष्टीकरण द्यावे

व्हॉट्सॲपचे प्रस्तावित धोरणबदल एकतर्फी असून डेटा व्यक्तिगतता, भारतीय वापरकर्त्यांचे निवड स्वातंत्र्य आणि स्वायत्तता यांवर घाला घातल्यासारखे आहे.-इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपCentral Governmentकेंद्र सरकारSocial Mediaसोशल मीडिया