आझम खान यांच्यावर जादूटोणा?; घराच्या आवारात फेकले बंडल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 09:08 IST2023-04-01T09:07:40+5:302023-04-01T09:08:12+5:30

आझम खान यांच्या घराच्या आवारात काही वस्तू फेकण्याची गुरुवारी घडलेली घटना सीसीटीव्हीत कैद झाली.

Witchcraft on Samazwadi Party Leader Azam Khan?; The bundle was thrown in the home yard | आझम खान यांच्यावर जादूटोणा?; घराच्या आवारात फेकले बंडल

आझम खान यांच्यावर जादूटोणा?; घराच्या आवारात फेकले बंडल

रामपूर : समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या घराच्या आवारात अज्ञात व्यक्तीने एक बंडल फेकले. त्यात जादूटोणासाठीच्या वस्तू असल्याचा संशय असून तशी तक्रार आझम खान यांच्या पत्नी तजीन फात्मा यांनी पोलिसांत दाखल केली आहे. 

आझम खान यांच्या घराच्या आवारात काही वस्तू फेकण्याची गुरुवारी घडलेली घटना सीसीटीव्हीत कैद झाली. यासंदर्भात तजीन फात्मा यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, जादूटोणाच्या वस्तू फेकण्याचा प्रकार एखाद्या मोठ्या कारस्थानाचा भाग असू शकतो. आझम खान यांच्या घराबाहेर वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था अहोरात्र असते. तरीही असे प्रकार घडावेत याबद्दल फात्मा यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. (वृत्तसंस्था)

काय होते बंडलमध्ये?

यासंदर्भात अतिरिक्त पोलिस अधीक्षक डाॅ. संसार सिंह यांनी म्हटले आहे की, आझम खान यांच्या घरात फेकलेल्या बंडलामध्ये काही कपडे, एक टोपी व आणखी काही वस्तू होत्या. हे कृत्य करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा पोलिस शोध घेत आहेत. तसेच आझम खान यांच्या घराभोवती असलेल्या सुरक्षा रक्षकांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली का याचीही चौकशी करण्यात येईल.

Web Title: Witchcraft on Samazwadi Party Leader Azam Khan?; The bundle was thrown in the home yard