कुजबूज--आणखी दोन, सद्गुरू

By Admin | Updated: August 31, 2015 00:24 IST2015-08-31T00:24:33+5:302015-08-31T00:24:33+5:30

भाजप-म.गो. संबंध

Wishful - Two more, Sadhguru | कुजबूज--आणखी दोन, सद्गुरू

कुजबूज--आणखी दोन, सद्गुरू

जप-म.गो. संबंध
.................
मनोहर र्पीकर मुख्यमंत्री होते, त्या वेळी सत्ताधारी भाजप आणि म.गो. यांच्यात जे संबंध होते, तसे राहिलेले नाहीत. याचा अर्थ म.गो.च्या एका मंत्र्यास मंत्रिमंडळातून वगळले जाईल असा होत नाही. र्पीकर पूर्वी म.गो. पक्षाशी जाणीवपूर्वक चांगले संबंध ठेवायचे. पार्सेकर मुख्यमंत्री बनल्यानंतर सत्ताधारी आघाडीतील समीकरणे थोडी बदललीत. विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येतील तसतशी समीकरणे बदलतील एवढे निश्चित. मगोच्या नेत्यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चांगले संबंध आहेत; पण पार्सेकरांशी तेवढे चांगले संबंध नसावेत, असेच म्हणण्यासारख्या घटना अलीकडे घडत आहेत. वाहतूक खात्यावर दोनवेळा दक्षता खात्याच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने छापे टाकले. एकदा वरिष्ठ अधिकार्‍यांना पकडले व शुक्रवारी वाहतूक खात्यातील शिपायाला लाचप्रकरणी पकडले गेले. राजकीयदृष्ट्याही या घटना बोलक्या आहेत.
..............
कार्यालयांची उद्घाटने
निवडणुका जसजशा जवळ येतील तसतशी राजकीय पक्षांची सक्रियता वाढेल. आतापासूनच काहीजण आपली कार्यालये विविध भागांत सुरू करू लागले आहेत. पुढील वर्ष विधानसभा निवडणुकीचे असेल. दर सहा महिन्यांनी यापुढे राजकीय समीकरणे बदलतील. म.गो. पक्ष आज रविवारी उसगावमध्ये कार्यालय सुरू करत आहे. उसगावचा हा भाग वाळपई मतदारसंघात येतो. येत्या ऑक्टोबरमध्ये विजयादशमीला वाळपईचे आमदार विश्वजित राणे उसगावमध्येच कार्यालय सुरू करणार आहेत. म.गो.चा वाळपईमध्ये हस्तक्षेप वाढतोय अशी चर्चा होतीच, कार्यालय सुरू झाल्यानंतर त्या चर्चेस बळ येईल. फोंड्याचे आमदार लवू मामलेदार यापुढे वाळपई मतदारसंघातून निवडणूक लढवतील, अशी चर्चाही फोंड्यात ऐकायला मिळते. त्या चर्चेत किती तथ्य आहे ते एवढय़ा लवकर सांगता येणार नाही.
.......

Web Title: Wishful - Two more, Sadhguru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.