लय भारी! विप्रोच्या दानशूर अझीम प्रेमजींनी पटकावला जगात तिसरा नंबर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 18:42 IST2020-05-10T18:41:17+5:302020-05-10T18:42:41+5:30
अझीम प्रेमजी यांनी मदतनिधीसाठी खजिनाच ओतला आहे. यामुळे प्रेमजी हे जगातील सर्वाधिक दान देणाऱ्यांमध्ये तिसरे अब्जाधिश ठरले आहेत.

लय भारी! विप्रोच्या दानशूर अझीम प्रेमजींनी पटकावला जगात तिसरा नंबर
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या लढाईत रतन टाटा यांच्यानंतर देशाला मदत करणारे विप्रोचे मालक अझीम प्रेमजी यांनी जगात तिसरा क्रमांक पटकावला आहे. कोरोना व्हायरसच्या मुकाबल्यासाठी जगभरातील ८० अब्जाधिशांनी हात सैल केले आहेत. यात प्रेमजी देखील मागे राहिलेले नाहीत.
अझीम प्रेमजी यांनी मदतनिधीसाठी खजिनाच ओतला आहे. यामुळे प्रेमजी हे जगातील सर्वाधिक दान देणाऱ्यांमध्ये तिसरे अब्जाधिश ठरले आहेत. पहिल्या क्रमांकावर ट्विटरचे मालक जॅक डॉर्सी असून दुसऱ्या क्रमांकावर मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स आहेत. तिसऱ्या क्रमांकावर भारताचे या यादीतील एकमेव अब्जाधिश अझीम प्रेमजी आले आहेत. या तीन व्यक्तींनी जगात सर्वाधिक दान केले आहे. फोर्ब्स मॅक्झिननुसार मार्चनंतर जगातील अब्जाधिशांच्या दान रकमेवर ही यादी बनविण्यात आली आहे.
अझीम प्रेमजी यांनी आता पर्य़ंत 132 मिलियन डॉलर म्हणजेच एक हजार कोटी रुपयांचे दान केले आहे. जगभरात 2,095 अब्जाधिश असून त्यांच्यापैकी अनेकांनी अद्याप दान केलेले नाही किंवा त्याची माहिती दिलेली नाही.
जगभरातील अब्जाधिशांची यादी....
जॅक डॉर्सी 7500 कोटी रुपये
बिल मेलिंडा गेट्स 1912 कोटी रुपये
अजीम प्रेमजी 990 कोटी रुपये
जॉर्ज सोरोस 975 कोटी रुपये
एंड्रयू फॉरेस्ट 750 कोटी रुपये
जेफ स्कोल 750 कोटी रुपये
जेफ बेजोस 750 कोटीरुपये
माइकल डेल 750 कोटी रुपये
माइकल ब्लूमबर्ग 558 कोटी रुपये
लिन एंड स्टॅसी शुस्टरमॅन 525 कोटी रुपये
महत्वाच्या बातम्या...
एकच धून 6 जून! रायगडावर शिवराज्याभिषेक होणारच; छत्रपती संभाजीराजेंची घोषणा
Vidhan Parishad Election: ९ जागांसाठी १० उमेदवार; तिढा सोडवण्यासाठी महाविकास आघाडीची बैठक
Vidhan Parishad Election: ...तर शिवसेनेने एक जागा कमी लढवावी, भाजपाचा युतीधर्मावरून टोला
Vidhan Parishad Election: राष्ट्रवादीकडून 'या' नेत्यांना विधान परिषदेची उमेदवारी
पीओकेवरून तणाव; पाकिस्तानची एफ १६, मिराज लढाऊ विमाने घिरट्या घालू लागली