शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञान आणि सत्य या मूल्यांच्या सहाय्यानं आपण कोरोनाची लढाई जिंकू शकतो : अझीम प्रेमजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 20:54 IST

Coronavirus : कोरोनाच्या लढाईत विप्रो आणि अझीम प्रेमजी यांनी केली मोठी मदत. त्यांच्याशिवाय टाटा समूह, स्टेट बँक, अदानी, महिंद्रा, सिप्ला, वेदांता यांसारख्या समूहांनीही केली मदत.

ठळक मुद्देकोरोनाच्या लढाईत विप्रो आणि अझीम प्रेमजी यांनी केली मोठी मदत.टाटा समूह, स्टेट बँक, अदानी, महिंद्रा, सिप्ला, वेदांता यांसारख्या समूहांनीही केली मदत.

सध्या देशात मोठ्या प्रमाणात करोनाबाधितांची वाढ होत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण येत आहे. देशातून आणि देशाबाहेरूनही अनेक जण मदतीसाठी पुढाकार घेत आहेत.  कोरोना विषाणूचा सामना करण्याची लढाई ही विज्ञान आणि सत्यावर आधारित असली पाहजे. तसंच याची पुनरावृत्ती होऊ नये हेदेखील आपण निश्चित केलं पाहिजे. याच मूल्यांच्या आधारावर आपण या महासाथीचा सामना करू शकतो, असं मत विप्रोचे संस्थापक अध्यक्ष अझीम प्रेमजी (Wipro founder chairman Azim Premji) यांनी व्यक्त केलं. 

"आपल्याला प्रत्येक पातळीवर तेजीनं प्रयत्न करणं आवश्यक आहे. आपले प्रयत्न हे विज्ञानावर आधारित असले पाहिजेत. तसंच या महासाथीचा सामना करण्यासाठी त्याचा विस्तार आणि प्रादुर्भावाच्या स्तरावर काम करावं लागेल," असंही अझीम प्रेमजी यांनी स्पष्ट केलं. एएनआयनं यासदंर्भातील वृत्त दिलं आहे. "अशा परिस्थितीत आपल्याला एक राष्ट्र म्हणून एकत्र राहावं लागेल. आपल्याला मतभेद विसरून एकत्र यावं लागेल. यातच शक्ती आहे आणि जर याचा आपण वेगवेगळं राहून सामना केला तर आपल्याला संघर्ष करावा लागेल," असंही त्यांनी नमूद केलं.सर्वात कमकूवत बाबीपर्यंत आपल्याला लक्ष केंद्रीत करायला हवं. याशिवाय कोरोना महासाथीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्थिती दु:खद झाली आहे. परंतु तुम्ही गावांकडे पाहा. जे गरीबीत जीवन जगत आहेत त्यांच्याकडे पाहा. सर्वकाही संपलं आहे. हे केवळ या महासाथीमुळे झालं नाही. तर अर्थव्यस्थेवर झालेल्या परिणामुळेही झालं आहे," असं त्यांनी नमूद केलं. गरजवतांना प्राधान्य द्यावं "गरजवंतांना मूलभूत सुविधांची आवश्यकता आहे. ते आपलं प्राधान्य असलं पाहिजे. महासाथीचा सामना केल्यानंतर आपल्याला समाज आणि अर्थव्यवस्थेच्या पुनर्निमाणाचं काम करावं लागेल. जेणेकरून कोणावरही असमानता किंवा अन्याय होऊ नये," असंही अझीम प्रेमजी म्हणाले. कोरोना लढाईतही प्रेमजी यांची मदतविप्रो आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशननं पुण्यातील एका आयटी प्रकल्पाचं ४३० बेड्सच्या रुग्णालयात परिवर्तन केलं आहे. तर दुसरीकडे इन्फोसिसनं नारायण हेल्थच्या माध्यमातून बंगळुरूमध्ये १०० खोल्याचं कोविड रुग्णालय उभारलं आहे. याशिवाय टाटा समूहानं आपल्या कंपन्यांच्या माध्यमातून कोरोनाबाधितांसाठी ५ हजार बेड्स उपलब्ध करून दिले आहे. तर १ हजार क्रायोजनिक कंटेनर्सची आयातही केली आहे. याशिवाय स्टेट बँक, टेक महिंद्रा, सिप्ला, वेदांत, आयटीसी आणि अदानी समूहानंही मदत केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतWiproविप्रोAzim Premjiअझिम प्रेमजी