शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

संसदेचे हिवाळी अधिवेशन ठरणार वादळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 06:11 IST

आजपासून सुरुवात; राजकारणाला कलाटणी मिळण्याची चिन्हे

- सुरेश भटेवरानवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निकालांबरोबरच मंगळवारपासून सुरू होणारे संसदेचे अधिवेशन प्रचंड वादावादी व संतप्त आरोप प्रत्यारोपांच्या फैरींनी गाजणार आहे. विरोधकांची बैठक व रविवारी रामलीला मैदानावर राम मंदिराच्या उभारणीबद्दल सरकारला इशारा देणारी झालेली सभा या घटनांमुळो संसदेचे हिवाळी अधिवेशन यंदा बरेच वादळी ठरणार याचे संकेत आहेत.संसदेत मोदी सरकारसमोर दुहेरी आव्हान आहे. पाच राज्यांच्या निकालांचे पडसाद पहिल्याच दिवशी जोरात उमटतील. राफेल सौदा, बुलंद शहरात जमावाच्या हल्ल्यात पोलीस निरीक्षकाचा झालेला खून, सीबीआयमध्ये सरकारने घातलेला घोळ, रिझर्व बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा यासारख्या मुद्यांवर दोन्ही सभागृहांत दुसऱ्या दिवसापासून काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष आक्रमक असतील. राफेल चौकशीसाठी विरोधकांनी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी)ची मागणी केली आहे. रा.स्व.संघ, संत महंतांची धर्मसभा, विश्व हिंदू परिषदेसह अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी राम मंदिरासाठी खास विधेयक हिवाळी अधिवेशनातच मंजूर करवून घेण्याचा आग्रह सरकारकडे धरला आहे. शिवसेना व भाजपाचे काही खासदार मंदिरासाठी कायदा तयार झालाच पाहिजे, अशी मागणी करीत आहेत. सुप्रीम कोर्टात राफेल सौदा व सीबीआय प्रकरणांची सुनावणी पूर्ण झाली आहे. दोन्ही याचिकांचे फक्त निकाल जाहीर होणे बाकी आहे. या आठवड्यात बहुधा निकाल लागतील, कारण पुढे न्यायालयाला नाताळची सुटी आहे.मोदींना हवे विरोधकांचे सहकार्य; राममंदिराची चर्चा नाही- हरीश गुप्तानवी दिल्ली : हिवाळी अधिवेशनाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी विरोधकांनी सहकार्य करावे आणि अधिवेशनाचा चांगला उपयोग करून घ्यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. २०१९ मध्ये होणाºया लोकसभा निवडणुकीपूर्वीचे हे अखेरचे पूर्ण अधिवेशन असणार आहे.संसद भवनात सर्वपक्षीय बैठकीत बोलताना मोदी यांनी स्पष्ट केले की, सरकार नियमानुसार सर्व मुद्यांवर चर्चा करण्यास तयार आहे. तथापि, यात इशाराही होता की, ‘सर्व मुद्यांवर चर्चा करू; मात्र नियम आणि प्रक्रियेनुसार.’ राफेल प्रकरणात सरकार जेपीसी चौकशीला तयार आहे काय? असा सवाल केला असता ते म्हणाले की, राफेल, शेतकºयांची दुरवस्था आणि अर्थव्यवस्था असे विषय विरोधकांना आहेत; पण त्यांनी या विषयांची प्राथमिकता ठरवायला हवी. कारण, या अधिवेशन काळात केवळ २० बैठका आहेत. एका मंत्र्यांनी स्पष्ट केले की, राम मंदिर हा चर्चेचा विषय नाही.सहकार्याचे आश्वासनराज्यसभेतील अध्यक्षांनी संसदीय पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली. याला ३१ नेते उपस्थित होते. विरोधी पक्षांसह सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. अरुण जेटली आणि गुलाम नबी आझाद यांनी आपण मांडणार असलेल्या विषयांबाबत माहिती दिली. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, सपाचे रामगोपाल यादव आदी नेत्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :ParliamentसंसदNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस