Wins and losses are a part of life. Best wishes to the team for their future by PM narendra modi | 'Best Wishes', पंतप्रधान मोदींनी 'विराट' संघाला सांगितला जीवनाचा मूलमंत्र
'Best Wishes', पंतप्रधान मोदींनी 'विराट' संघाला सांगितला जीवनाचा मूलमंत्र

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन टीम इंडियाचं अभिनंदन केलं आहे. भारतीय संघाने संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली. अत्यंत चुरशीच्या सामन्यात भारताने दिलेला लढा नक्कीच कौतुकास्पद होता.

नवी दिल्ली - विश्वचषक सामन्यातील उपांत्य फेरीत भारताला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना पत्कारावा लागला. मात्र, अत्यंत चुरशीच्या सामन्यात भारताने दिलेला लढा नक्कीच कौतुकास्पद होता. त्यामुळे गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीत भारताने उत्कृष्ट कामगिरी केली. मात्र, सामन्याचा निकाल आपल्यासाठी निराशाजनक राहिला. शेवटच्या क्षणापर्यंत टीम इंडियाने लढत दिली हे पाहायला नक्कीच मजा आली, असेही मोदींनी म्हटले आहे.    

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीट्विटरवरुन टीम इंडियाचं अभिनंदन केलं आहे. भारतीय संघाने संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे टिम इंडियाच्या खेळाचा आम्हाला अभिमान आहे. जय आणि पराजय हा जगण्याचा एक भाग आहे. त्यामुळे पुढील कारकिर्दीसाठी टीम इंडियास मनपूर्वक शुभेच्छा असे म्हणत पंतप्रधान मोदींनी टीम इंडियाचे कौतुक केले आहे. तसेच, भारतीय संघाच्या उत्कृष्ट खेळाचे समर्थन करताना पराभवानेही न खचण्याचेच सूचवले आहे. 

दरम्यान, आघाडीच्या फलंदाजांनी निराशा केल्यानंतर रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनी यांनी सेमीफायनल जिंकण्याच्या आशा जिवंत केल्या खऱ्या, पण जडेजानंतर अत्यंत महत्त्वाच्या क्षणी धोनी रन आउट झाला आणि टीम इंडियाही वर्ल्डकपमधून आउट झाली. भारतीय संघाचा न्यूझीलंडविरुद्ध 18 धावांनी पराभव झाला. या पराभवामुळे भारतावर सलग दुसऱ्या व आतापर्यंत चौथ्या विश्वचषकात सेमीफायनलमध्ये पराभव पत्करण्याची वेळ आल्याचे दिसून आले. 


Web Title: Wins and losses are a part of life. Best wishes to the team for their future by PM narendra modi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.