'पाकिस्तानसोबतचे संबंध सुधारण्यासाठी यापुढेही प्रयत्न करणार'
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2018 17:38 IST2018-06-19T17:38:34+5:302018-06-19T17:38:34+5:30
हा राजकीय भूकंप घडवून आणल्यानंतर भाजपने काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे

'पाकिस्तानसोबतचे संबंध सुधारण्यासाठी यापुढेही प्रयत्न करणार'
श्रीनगर - आज भाजपाने जम्मू-काश्मीरमधील पीडीपी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. हा राजकीय भूकंप घडवून आणल्यानंतर भाजपने काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, भाजपनं पाठिंबा काढून घेतल्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर श्रीनगरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या की, पाकिस्तानशी चांगले संबंध प्रस्थापित करणं गरजेचे आहे. शांततेसाठी सर्वांशी चर्चा केली पाहिजे. पाकिस्तानशी संबंघ सुधारण्यासाठी यापुढेही प्रयत्न सुरुच राहणार आहेत. जनहितासाठी आम्ही एकत्र आलो होते. पण भाजपाने पाठिंबा काढून घेतला आहे.
#WATCH LIVE from Srinagar: Mehbooba Mufti addresses a Press Conference #JammuAndKashmirhttps://t.co/oHY3JLHHu2
— ANI (@ANI) June 19, 2018