शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

१३ वेळा राजघराणे सत्तेत येण्याचा विक्रम यावेळी मोडणार? हिमाचलमध्ये राजघराणे नव्हे, वैयक्तिक संबंध महत्त्वाचे ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 14:57 IST

२०१९ ची निवडणूक राजघराण्यातील एकाही सदस्याने लढवली नव्हती.

शिमला : यापूर्वीच्या राजघराण्यांनी हिमाचलच्या राजकारणात तीन दशके वर्चस्व गाजवले होते, परंतु आता निवडणुकीत मतदारांशी वैयक्तिक संबंध अधिक महत्त्वाचे ठरत आहेत. येथे राजघराण्यातील एकच सदस्य २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवत आहे. काँग्रेस नेते विक्रमादित्य सिंह हे मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. २०१९ ची निवडणूक राजघराण्यातील एकाही सदस्याने लढवली नव्हती.

४ जागांसाठी ३७ उमेदवार रिंगणात देवभूमीमध्ये लोकसभेच्या विधानसभेच्या ६ ४, जागांवर पोटनिवडणुकीसाठी एकाच वेळी मतदान आहे. लोकसभेच्या ४ जागांसाठी ३७ उमेदवार रिंगणात आहेत, तर ६ विधानसभा जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी २५ उमेदवार रिंगणात आहेत.

भाजप म्हणते...• भाजप नेते, तीन वेळा खासदार आणि कुल्लू राजघराण्याचे राजा महेश्वर सिंह यांनी सांगितले की, ज्या नेत्यांनी लोकांची सेवा केली आहे त्यांचा सन्मान केला जातो. आता राजघराण्यांचा प्रभाव दिसत नाही. लोकांशी कसे वागता हे महत्त्वाचे आहे.

काँग्रेस म्हणते...काँग्रेस नेत्या, चंबा राजघराण्यातील सदस्या आशा कुमारी म्हणाल्या की, वैयक्तिक समीकरणे महत्त्वाची ठरतात. विक्रमादित्य सिंह यांना सहावेळा मुख्यमंत्री राहिलेल्या वीरभद्र सिंह यांचा मुलगा असल्याचा फायदा होत आहे. मात्र त्यांनी स्वतःची ओळख रामपूर राज्याचे राजा म्हणून बनविलेली नाही.

लोक म्हणतात...निवडणुकीत राजघराण्यांचा प्रभाव कमी होत असल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. मंडी लोकसभा मतदारसंघाने १९५२ पासून झालेल्या दोन पोटनिवडणुकांसह १९ निवडणुकांमध्ये राजघराण्यातील सर्वाधिक १३ सदस्य निवडून आणण्याचा विक्रम केला आहे, असे मंडीच्या बल्ह भागातील स्थानिक रहिवासी प्रियांका यांनी सांगितले.अभिनेत्री वरचढ ठरणार?• रामपूरचे वंशज विक्रमादित्य सिंह हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंडीचे विद्यमान खासदार प्रतिभा सिंह यांचे पुत्र आहेत.त्यांचा मुकाबला भाजप उमेदवार आणि अभिनेत्री कंगना रणौतशी होत आहे. हिमाचलमधील १ जून रोजी मतदान आहे.

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Himachal Pradeshहिमाचल प्रदेशKangana Ranautकंगना राणौतBJPभाजपा