शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 15:38 IST

अहमदाबाद येथील विमान अपघातामध्ये २६५ लोकांचा मृत्यू झाला. एअर इंडियाच्या विमानात २४२ लोक प्रवास करत होते. टाटा समुहाने मृतांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली.

अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात झाला. हे विमान लंडनसाठी निघाले होते. पण, टेक ऑफनंतर आठ मिनिटांतच हे विमान कोसळले. या दुर्घटनेत २६५ लोकांचा मृत्यू झाला. अपघातानंतर टाटा समुहाचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी मृतांच्या कुटुंबियांना एक-एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली. यानंतर ही मदत फक्त विमानात प्रवास करणाऱ्यांच्या कुटुंबियांना मिळणार की वसतिगृहातील मृतांच्या कुटुंबियांना मिळणार याबाबत चर्चा सुरू होत्या. दरम्यान, आता टाटा समुहाने यावर स्पष्टीकरण दिले आहे. 

'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते

एअर इंडियाच्या विमानाच्या  अपघातात जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला १ कोटी रुपये भरपाई दिली जाईल. म्हणजे विमानात प्रवास करत असलेल्या २४२ लोकांशिवाय अन्य २४ लोकांच्या कुटुंबियांनाही ही मदत दिली जाणार आहे, असं टाटा समुहाने स्पष्टीकरण दिले आहे. यामध्ये किमान पाच एमबीबीएस विद्यार्थी, एक पीजी निवासी डॉक्टर आणि एका सुपरस्पेशालिस्ट डॉक्टरच्या पत्नीचा समावेश आहे.

जखमींच्या उपचाराचा खर्चही टाटा समुह देणार

अपघातात जखमी झालेल्या सर्व लोकांच्या उपचारांचा खर्च उचलण्यासोबतच त्यांना पूर्ण मदत आणि आवश्यक काळजी मिळेल याची खात्री टाटा ग्रुपने केली आहे. बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या इमारतीच्या पुनर्बांधणीसाठीही आम्ही मदत करू, असंही टाटा समुहाने सांगितले आहे. 

गुरुवारी एअर इंडियाचे बोईंग 787-8 ड्रीमलायनर विमान अहमदाबादमधील सरदार पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनसाठी उड्डाण केले. टेकऑफ केल्यानंतर लगेचच या विमानाला अपघात झाला.

उड्डाणानंतर लगेचच, एअर इंडियाचे विमान मेघानीनगर परिसरातील बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या इमारतीवर कोसळले . अपघात झाला तेव्हा दुपारच्या जेवणाची वेळ होती आणि मोठ्या संख्येने डॉक्टर आणि विद्यार्थी वसतिगृहाच्या मेसमध्ये जेवणासाठी उपस्थित होते. यामुळे वसतिगृहातील अनेकजण जखमी झाले आहेत.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाGujaratगुजरातAccidentअपघात