शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस सोडून भाजपात सामील होणार? शशी थरुर यांचे सूचक विधान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 14:33 IST

Shashi Tharoor: काँग्रेस नेते शशी थरुर गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहेत.

Shashi Tharoor: काँग्रेस नेते शशी थरुर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर भारत सरकारने स्थापन केलेल्या शिष्टमंडळात थरुर सामील असून, परदेशात ते भारताची बाजू भक्कमपणे सांभाळत आहेत. पण, यावरुन त्यांच्याच पक्षातील काही नेते त्यांच्याविरुद्ध अतिशय टोकाची विधाने करत आहेत. अशा विधानांमुळे सोशल मीडियावर थरुर काँग्रेस पक्षात राहतील की, भाजपमध्ये सामील होतील, अशी अटकळ बांधली जात आहे? याबाबत आता स्वतः थरुर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

काय म्हणाले थरूर ?शशी थरूर भारताने जगभरात पाठवलेल्या शिष्टमंडळाचा भाग आहेत. ते विविध देशांमध्ये जाऊन दहशतवाद आणि पाकिस्तानबाबत भारताच्या धोरणाची माहिती देत आहेत. सध्या थरूर अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये आहेत. यावेळी त्यांना विचारण्यात आले की, काँग्रेस पक्षाचे नेते ज्या प्रकारे तुमच्यावर टीका करत आहेत, त्यामुळे सोशल मीडियावर अशी अटकळ बांधली जात आहे की, तुम्ही काँग्रेस सोडून भाजपमध्ये सामील व्हाल किंवा वेगळा राजकीय मार्ग निवडाल. या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर देताना थरूर म्हणाले की, 'मी संसदेचा निवडून आलेला सदस्य आहे, माझ्याकडे अजूनही ४ वर्षे शिल्लक आहेत, असा प्रश्न कोणी उपस्थित करू नये,' अशी प्रतिक्रिया थरुर यांनी दिली.

काँग्रेस नेत्यांची टीका?शशी थरूर भारताने जगभरात पाठवलेल्या शिष्टमंडळाचा भाग आहेत. ते विविध देशांमध्ये जाऊन दहशतवाद आणि पाकिस्तानबाबत भारताच्या धोरणाची माहिती देत आहेत. पण, यामुळेच आता ते काँग्रेस नेत्यांच्या निशाण्यावर आले आहेत. अनेक काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर भाजपचे प्रवक्ते झाल्याची टीका केली. त्यामुळेच आता त्यांची भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. 

काँग्रेस नेते उदित राज यांनी थरुर यांना लक्ष्य करताना म्हटले की, काँग्रेसने त्यांना सर्व काही दिले, परंतु त्यांनी काँग्रेसविरुद्ध विधाने करुन स्पष्ट केले की, त्यांना काँग्रेसचे कल्याण नको आहे. दुसरीकडे, पवन खेरा म्हणाले होते की, शशी थरुर यांनी त्यांच्या पुस्तकात सर्जिकल स्ट्राईकवर टीका केली होती, परंतु आता ते वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन त्याचे कौतुक करत आहेत. त्यांना काँग्रेस नेत्यांनी भाजपचे सुपर प्रवक्तादेखील म्हटले.

भाजपकडून थरुर यांचे कौतुकएकीकडे काँग्रेस थरुर यांना लक्ष्य करत आहे, तर भाजप त्यांची प्रशंसा करण्याची एकही संधी सोडत नाही. भाजपचे म्हणणे आहे की, विरोधी पक्षाचे असूनही, थरुर यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची खूप जाणीव आहे आणि ते त्यांचे काम अतिशय प्रामाणिकपणे करत आहेत. 

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेसBJPभाजपाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला