रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 19:58 IST2025-08-21T19:57:16+5:302025-08-21T19:58:50+5:30

विमानातून प्रवास करताना सामान घेऊन जाण्याचे नियम आहे. नियमापेक्षा जास्त सामान असल्यास पैसे द्यावे लागतात, अशीच पद्धती रेल्वेतही सुरू होणार असल्याची माहिती समोर आली. त्यावर रेल्वेमंत्री काय बोलले?

Will railway passengers have to pay fine for excess baggage? Railway Minister Vaishnav said... | रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...

रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...

Railway Luggage Charges: रेल्वेतून प्रवास करताना आता मर्यादित स्वरूपातच सामान घेऊन जाता येणार. जास्तीचे सामान असेल, तर पैसे मोजावे लागणार, अशी बातमी दिली गेली. पण, हे वृत्त केंद्रीय रेल्वेमंत्रीअश्विनी वैष्णव यांनी फेटाळून लावले आहे. अनेक दशकांपासून असा नियम आहे की, प्रवाशी सोबत कितीही सामान घेऊ जाऊ शकतात. आता कोणताही नवीन नियम बनवला गेलेला नाही, असे वैष्णव यांनी स्पष्ट केले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

आजतक वृत्तवाहिनीशी बोलताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, जास्त सामानावर कोणत्याही प्रकारचा दंड आकारला जाणार नाही. अनेक दशकांपासून प्रवाशी कितीही सामान घेऊन जाऊ शकतात. जास्त सामान घेऊन जात असेल, तर दंड आकारला जात नाही. आता कोणताही नवीन नियम तयार केला गेलेला नाही, अशी माहिती वैष्णव यांनी दिली. 

आधी अशी माहिती समोर आली होती की, भारतीय रेल्वेनेही आता विमानाप्रमाणेच सामानाबद्दल नियम तयार केले आहेत. निर्धारित वजनापेक्षा जास्त सामान जर रेल्वेतून नेल्यास त्या प्रवाशांना जास्तीचे पैसे द्यावे लागणार, असा नियम असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले गेले होते. 

रिपोर्टमध्ये असेही म्हटले गेले होते की, हा नियम आधीपासूनच अस्तित्वात आहे, फक्त त्याची सक्तीने अमलबजावणी केली जात नाही. या नियमानुसार निर्धारित केलेल्या वजनापेक्षा कमी सामानच मोफत नेता येऊ शकते. पण, सामानाचे वजन त्यापेक्षा जास्त असेल तर अतिरिक्त पैसे द्यावे लागणार. 

Web Title: Will railway passengers have to pay fine for excess baggage? Railway Minister Vaishnav said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.