राहुल गांधी शिक्षेला आज देणार आव्हान?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2023 07:53 IST2023-04-03T07:51:57+5:302023-04-03T07:53:43+5:30

सुरत न्यायालयाने मानहानीच्या प्रकरणात राहुल यांना ठरवलं दोषी

Will Rahul Gandhi challenge punishment today in Upper Court Regarding Modi Surname case | राहुल गांधी शिक्षेला आज देणार आव्हान?

राहुल गांधी शिक्षेला आज देणार आव्हान?

लोकमत न्यूज नेटवर्क, सुरत: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवल्याच्या ११ दिवसांनंतर राहुल त्याविराेधात सोमवारी सुरतच्या सत्र न्यायालयात आव्हान देणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

राहुल यांची टीम ३ एप्रिलला याचिका दाखल करणार आहे. २३ एप्रिल रोजी राहुल यांच्या उपस्थितीत सुरत कनिष्ठ न्यायालयाने त्यांना एक वर्षाची शिक्षा आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करत शिक्षा ३० दिवसांसाठी स्थगित केली.

Web Title: Will Rahul Gandhi challenge punishment today in Upper Court Regarding Modi Surname case