आपल्याकडे याचं समाधानकारक उत्तर कधीच नसेल; कोविड मृत्यूंच्या आकडेवारीवर म्हणाले अरविंद सुब्रह्मण्यम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 08:58 AM2021-07-24T08:58:55+5:302021-07-24T09:01:49+5:30

Coronavirus Deaths In India : काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या अभ्यासात देशात कोरोनामुळे ५० लाख मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. आपल्याला स्पष्टता आणण्याची गरज, सुब्रह्मण्यम यांचं वक्तव्य.

will never have a satisfactory answer to this Arvind Subramanian on the covid 19 deaths | आपल्याकडे याचं समाधानकारक उत्तर कधीच नसेल; कोविड मृत्यूंच्या आकडेवारीवर म्हणाले अरविंद सुब्रह्मण्यम

आपल्याकडे याचं समाधानकारक उत्तर कधीच नसेल; कोविड मृत्यूंच्या आकडेवारीवर म्हणाले अरविंद सुब्रह्मण्यम

Next
ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी समोर आलेल्या अभ्यासात देशात कोरोनामुळे ५० लाख मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.आपल्याला स्पष्टता आणण्याची गरज, सुब्रह्मण्यम यांचं वक्तव्य.

नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अभ्यासातून भारतात कोरोना महासाथीमुळे दीड वर्षांत जवळपास ५० लाख मृत्यू झाल्याचं म्हटलं होतं. तसंच यातील लाखो मृत्यू रकॉर्डमध्येही नसल्याचं सांगण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर माजी मुख्य आर्थिक सल्लागारर अरविंद सुब्रह्मण्यम (Arvind Subramanian) यांनी आपलं मत व्यक्त केलं. "आपल्याला अधिक स्पष्टता आणण्याची गरज आहे. आपल्याकडे याचं समाधानकारक उत्तर कधीही नसेल. आरोग्य सूचना प्रणाली चांगली नाही. हा आपला सर्वात चांगला अंदाज आहे, हा थोडाफार कमी जास्त असू शकतो. इतका अधिक सिरो प्रसार, इतकी मोठी लोकसंख्या, हे (मृत्यूंची संख्या) ते आहे ज्याची आपण अपेक्षा करत होतो. भारतात आपण मृत्यू योग्यप्रकारे मोजू शकत नाही," असं सुब्रह्मण्यम म्हणाले.

"जर तुम्हाला संसर्ग झाला असले तर मृत्यूची शक्यता भारतात अधिक आहे. याला सर्वच कारणांनी अधिक मृत्यू म्हटलं जातं, जे एका महासाथीदरम्यान मृत्यू मोजण्याची पद्धत बनली आहे. परंतु या ठिकाणी ते किती कमी हा एकमेव प्रश्न आहे, वास्तवात काय घडलं, यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे," असं सुब्रह्मण्यम म्हणाले. त्यांनी एनडीटीव्हीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान, यावर भाष्य केलं. 

"या अभ्यासात सरकारनं आकडेवारीत काही फेरफार केला आहे असं कधीही सांगण्यात आलं नाही. गोष्ट फक्त इतकीच आहे की आपली सिस्टम तितकी चांगली नाही जितकी असायला हवी. धडा शिकण्यासाठी आणि भविष्यात तयार होण्यासाठी आपल्या सर्वांना आपत्तीचे पूर्ण प्रमाण माहित असणे आवश्यक आहे," असंही ते म्हणाले. सीआरएस मृत्यूंबाबत मोठे आकडे असलेली सात राज्य आणि अनेक शहरांचा डेटा उपलब्ध आहे. या सात राज्यांमध्ये भारतातील ५० टक्के लोकसंख्या आहे. अधिक आकडेवारी मेपर्यंतची आहे, जूनची आकडेवारी अजूनही आलेली नाही. ही एक सातत्यानं सुरू राहणारी प्रक्रिया असल्याचंही त्यांनी नमूद केलं. 

चांगल्या प्रतीमेसाठी समोर आलं नाही
"या महासाथीदरम्यान कोणतंही सरकार आणि समाज चांगली प्रतीमा निर्माण करम्यासाठी समोर आलेला नाही. सर्वच देशांनी गंभीर चुका केल्या आहेत. काय झालं याची माहिती घेण्यासाठी राज्य सरकारांनी गंभीरपणे सर्वेक्षण करायला हवं. आपल्याला अनेक स्त्रोतांची आवश्यकता आहे," असंही सुब्रह्मण्यम यांनी स्पष्ट केलं. 

दीड वर्षांत ५० लाख मृत्यू
अमेरिकेतील नवीन अध्ययनानुसार भारतात जानेवारी २०२० ते जून २०२१ दरम्यान कोरोनाने जवळपास ५० लाख लोकांचा मृत्यू झाला असावा. फाळणीनंतरची ही सर्वांत मोठी मानवी शोकांतिका बनली आहे. दुसरीकडे, डेल्टा विषाणूमुळे जगभरात चिंतेची छाया पसरली आहे. सेरोलॉजिकल अध्ययन, घरोघर जाऊन करण्यात आलेले सर्व्हेक्षण, सरकारी आणि स्थानिक संस्थांची अधिकृत आकडेवारी तसेच आंतरराष्ट्रीय अंदाजाच्या आधारे हे अध्ययन करण्यात आले असून त्यासंबंधीचा अहवाल काही दिवसांपूर्वी जारी करण्यात आला होता.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: will never have a satisfactory answer to this Arvind Subramanian on the covid 19 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app