शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Reliance AGM 2019: जम्मू-काश्मीर, लडाखबद्दल मुकेश अंबानींचे मोठे संकेत; मोदींसाठी बॅटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 13:56 IST

मोदींच्या निर्णयाचं मुकेश अंबानींकडून स्वागत

मुंबई: रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या वार्षिक बैठकीत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यामध्ये जिओ, तेल क्षेत्रासोबतच अनेक घोषणांचा समावेश होता. मोदी सरकारनं केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा दिलेल्या जम्मू-काश्मीर आणि लडाखबद्दलही अंबानींनी मोठे संकेत दिले. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांचा शैक्षणिक खर्च रिलायन्सकडून केला जाणार असल्याचं अंबानी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जम्मू-काश्मीर आणि लडाखबद्दलचा दृष्टीकोन पाहता आमच्या कंपनीनं त्या भागात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुकेश अंबानी यांनी दिली. यासाठी एका विशेष टीमची स्थापना करण्यात आली असून याबद्दलची योजना लवकरच जाहीर करण्यात येईल, असं अंबानी यांनी सांगितलं. 'पुलवामातील हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. त्या जवानांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च रिलायन्स करेल,' असं ते म्हणाले. यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. रिलायन्सच्या वार्षिक सभेत बोलताना अंबानी यांनी मोदी सरकारसाठी जोरदार बॅटिंग केली. गेल्याच आठवड्यात मोदी सरकारनं जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतला. याशिवाय जम्मू-काश्मीर, लडाखला केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा देण्याचीदेखील घोषणा केली. याबद्दल अंबानींनी मोदी सरकारचं कौतुक केलं. मोदींनी 2024 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियनवर नेण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. याबद्दलचा उल्लेखदेखील त्यांनी वारंवार केला आहे. 5 ट्रिलियनचं ध्येय गाठणं शक्य असून त्यात रिलायन्स मोठी भूमिका बजावेल, असं अंबानी म्हणाले. देशाच्या अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ तात्पुरत्या स्वरुपाची असून देश लवकरच घोडदौड करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीJammu Kashmirजम्मू-काश्मीरRelianceरिलायन्सladakhलडाखNarendra Modiनरेंद्र मोदीJioजिओReliance Jioरिलायन्स जिओReliance Communicationsरिलायन्स कम्युनिकेशन