तरुणांना महिना ३,००० रुपये देणार : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 05:24 IST2023-03-21T05:24:12+5:302023-03-21T05:24:23+5:30

राहुल म्हणाले की, कर्नाटकातील सर्व लोक म्हणतात की बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे देशातील “सर्वांत भ्रष्ट सरकार” आहे.

Will give Rs 3,000 per month to youth: Rahul Gandhi | तरुणांना महिना ३,००० रुपये देणार : राहुल गांधी

तरुणांना महिना ३,००० रुपये देणार : राहुल गांधी

बेळगाव : कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे ४० टक्के कमिशनचे सरकार असून, आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे सर्व नेते एकत्र येऊन भाजपचा सुपडासाफ करतील, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी म्हटले.

काँग्रेसचे सरकार आल्यास तरुणांना महिना ३ हजार रुपये दिले जातील, असे आश्वासन त्यांनी बेळगाव येथील  जाहीर सभेत युवकांना दिले. राहुल म्हणाले की, कर्नाटकातील सर्व लोक म्हणतात की बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे देशातील “सर्वांत भ्रष्ट सरकार” आहे.

- प्रत्येक पदवीधारक तरुणाला दोन वर्षांपर्यंत महिन्याला तीन हजार रूपये
- डिप्लोमाधारक तरुणांना दोन वर्षांसाठी दरमहा १,५०० रुपये
- पाच वर्षांत दहा लाख तरुणांना रोजगार देणार
- अडीच लाख सरकारी पदे भरणार
- महिला आणि गरीब कुटुंबांसाठीही योजना आणणार

Web Title: Will give Rs 3,000 per month to youth: Rahul Gandhi