‘त्या’ भारतीय जवानाला पाकिस्तान आज सोपवणार

By Admin | Updated: August 8, 2014 02:16 IST2014-08-08T02:16:41+5:302014-08-08T02:16:41+5:30

जम्मू-काश्मीरच्या चिनाब नदीतून पाकिस्तान हद्दीत वाहून गेलेल्या भारतीय सुरक्षा दलाच्या(बीएसएफ) जवानाला पाकिस्तान उद्या शुक्रवारी भारताला सोपवणार आह़े

'That' will give the Indian prisoner to Pakistan today | ‘त्या’ भारतीय जवानाला पाकिस्तान आज सोपवणार

‘त्या’ भारतीय जवानाला पाकिस्तान आज सोपवणार

>नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या चिनाब नदीतून पाकिस्तान हद्दीत वाहून गेलेल्या भारतीय सुरक्षा दलाच्या(बीएसएफ) जवानाला पाकिस्तान उद्या शुक्रवारी भारताला सोपवणार आह़े 
काल बुधवारी बीएसएफचे जवान सत्यशील यादव अन्य तीन जवानांसोबत गस्तीवर होत़े याचदरम्यान त्यांच्या मोटरबोटीत तांत्रिक बिघाड आल्याने ते चिनाब नदीत वाहून गेले होत़े त्यांना तात्काळ शोधण्याचे प्रयत्न केले गेले मात्र ते सापडले नव्हत़े याचदरम्यान सत्यशील यादव पाकिस्तानात वाहून गेले व सियालकोट येथे पोहाचल़े स्थानिक लोकांनी त्यांना पकडून नंतर रेंजर्सच्या हवाली केले होत़े
बीएसएफ सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, सत्यशील यांना परत आणण्यासाठी आज गुरुवारी जम्मूच्या सुंदरबनी सेक्टरमधील निकोवाल सीमा चौकी भागात कंपनी कमांडर स्तरावरील ध्वज बैठक पार पडली़ यावेळी यादव यांना उद्या भारताला सोपवले जाईल, अशी हमी 
पाक रेंजर्सने दिली़  (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: 'That' will give the Indian prisoner to Pakistan today