शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
4
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
5
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
6
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
7
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
8
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
9
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
10
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
11
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
12
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
13
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
14
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
15
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
16
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
17
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
18
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
19
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
20
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 

एक्झिट पोल किती खोटे, किती खरे...भूतकाळात काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2018 22:04 IST

विविध एक्झिट पोल सर्व वृत्तवाहिन्यांनी दिले आहेत.

नवी दिल्ली- कर्नाटक विधानसभेसाठी आज मतदान पार पडलं. एकुण 70 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. कर्नाटक विधानसभेवर नेमकी कोण सत्ता स्थापन करणार? याबद्दलचा अंदाज देणारे विविध एक्झिट पोल सर्व वृत्तवाहिन्यांनी दिले आहेत. भाजपा-काँग्रेस या दोन पक्षांपैकी कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचं या एक्झिट पोलमधून समोर आलं आहे. पण वृत्तवाहिन्यांनी व वृत्तसंस्थांनी जाहीर केलेले एक्झिट पोल किती खरे ठरणार ? याबद्दलही आता चर्चा आहे. एक्झिट पोलमधून समोर आलेले आकडे अनेकदा खोटे ही ठरतात. तसं चित्र याआधी पाहायला मिळालं आहे. एक्झिट पोल किती खोटे, किती खरे.. भूतकाळात नेमकं काय घडलं होतं? हे जाणून घेण्यासाठी चार मोठ्या राज्यांच्या म्हणजेच गुजरात, पंजाब, उत्तर प्रदेश व बिहार निवडणुकीनंतर समोर आलेल्या एक्झिट पोलवर एक नजर टाकूया. 

गुजरात 2018मतदानानंतर विविध वृत्तवाहिन्या व वृत्त संस्थांनी भाजपाला गुजरात निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचं सांगतिलं होतं. पण मार्जिन नेमकं किती असेल याबद्दलची माहिती कुणालाही देता आली नाही. गुजरात निवडणुकीबद्दल टूडेज चाणक्यचा एक्झिट पोल पूर्णपणे चुकीचा ठरला. गुजरातमध्ये भाजपाला 135 जागा मिळतिल असं टूडेज चाणक्यने एक्झिट पोल सांगितला होता. टाइम्स नाउ व्हिएमआरच्या एक्झिट पोलनूसार भाजपाला 115 जागा मिळतील तर काँग्रेसला 65 जागा मिळण्याचा अंदाज होता. रिपब्लिक-सी वोटर्स आणि  न्यूज 18-सी वोटर्सनुसार भाजपाला 108 आणि काँग्रेसला 74 जागा मिळणार असं सांगितलं गेलं होतं. पण एक्झिट पोलचे हे नंबर काहीसे चुकीचे ठरले. गुजरातमध्ये भाजपाला 99 जागा मिळाल्या. 2012च्या निवडणुकीपेक्षा 16 जागा कमी मिळाल्या. पण गुजरातमध्ये सत्ता स्थापनेसाठी या जागा पुरेश्या होत्या. पण काँग्रेसने 2018मध्ये चांगली कामगिरी केली. 

पंजाब 2017पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचा दारूण पराभव होईल, असा अंदाज कुठल्याही एक्झिट पोलने वर्तविला नव्हता. पंजाबमध्ये आम आदमी पार्टी व काँग्रेसमध्ये काँटेकी टक्कर होईल, असं विविध एक्झिट पोलने सांगितलं. पण हे सर्व अंदाज खोटे ठरले. इंडिया टीव्ही-सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार 67 पैकी 59 जागा जिंकत आप सत्ता स्थापन करेल,असं सांगण्यात आलं. न्यूड 24-चाणक्य आणि न्यूज एक्स-एमआरसीच्या एक्झिट पोलनुसार आप व काँग्रेसला समान जागा मिळतील. द इंडिया टूडे-अॅक्सिस एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला 62-71 जागा देण्यात आल्या तर आपला 42-51 जागा देण्यात आल्या. एबीपी-सीएसडीसीच्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेस मोठा पक्ष असल्याचा दावा होता. पण निकालानंतर एक्झिट पोलचे अंदाज खोटे ठरले. पंजाबमध्ये आपला फक्त 20 जागा मिळाल्या. 

उत्तर प्रदेश 2017उत्तर प्रदेश निवडणुकीसंदर्भातील सगळे एक्झिट पोल भाजपाच्या बाजूचे होते. भाजपाचा विलक्षण विजय, काँग्रेस- सपाचं सपशेल अपयश कुणीही सांगितलं नाही. एबीपी-सीएसडीसी आणि इंडिया टीव्ही-सी वोटरने भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरणार असण्याचा दावा केला होता. न्यूज 24- इंडिया चाणक्यचा एक्झिट पोल काहीसा बरोबर ठरला. भाजपाचा मोठा विजय असेल अस या एक्झिट पोलने म्हटलं होतं. 267-303 जागा मिळतील असा अंदाज होता. समाजवादी पक्ष व काँग्रेसच्या युतीला 73-103 जागा मिळतील आणि बहुजन समाज पक्षाला 15-39 जागा मिळतील, असा अंदाज होता. निकालानंतर उत्तर प्रदेशात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरलाय 403 जागांच्या विधानसभेत भाजपने 324 जागा आपल्या नावे केल्या. 

बिहार 2015बिहार निवडणुकीचा निकाल सर्वांची उत्कंठा ताणणारा होता. एबीपी-नेन्सनच्या एक्झिट पोलने नितीश कुमार व लालू प्रसाद यादव यांच्या महायुतीला 130 जागा मिळतील तर भाजपाला 108 जागांवर समाधान मानावं लागेल, असा दावा केला होता. टाइम्स नाउ-सी वोटरने महायुतीला 122 जागा दिल्या होत्या तर भाजपाला 111 जागा मिळणार असल्याचा दावा केला होता. पण निकालानंतर एकही एक्झिट पोलचे आकडे निकालाच्या अगदी जवळचेही नसल्याचं सिद्ध झालं. बिहारमध्ये महायुतीचा 178 जागा मिळवत विजय झाला. 

 

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८