शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

सत्ताधाऱ्यांविरोधात कौल देण्याची परंपरा मोडणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2018 6:41 AM

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राजस्थान विधानसभेसाठी शुक्रवारी मतदान होत आहे.

- सुहास शेलारजयपूर : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राजस्थान विधानसभेसाठी शुक्रवारी मतदान होत असून, गेल्या २५ वर्षांत सत्ताधाºयांच्या विरोधात कौल देण्याची राजस्थानी मतदारांची परंपरा यंदा कायम राहणार का? याचा फैसला आता मंगळवारी होणार आहे.१९९ जागांसाठी २२८८ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. पण मुख्य स्पर्धा आहे ती काँग्रेस आणि भाजपा यांच्यातच आहे. शिवाय विविध निवडणूकपूर्व सर्वेक्षणांनीही काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याचे अंदाज आहेत. मात्र, भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी विशेष रणनीती आखून प्रचारात घेतलेली आघाडी सर्वेक्षणांचे आकडे व सत्ताबदलाची परंपरा मोडीत काढते का? याकडे साºयांचे लक्ष लागले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजस्थानच्या निवडणुकीला महत्त्व आले आहे.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीचे रणशिंग नरेंद्र मोदींनी येथील अलवर जिल्ह्यातून फुंकले होते. त्यामुळे भाजपासाठी ही निवडणूक जिंकणे प्रतिष्ठेचे बनले आहे. मात्र, भाजपाला राजस्थानातून पायउतार करण्यासाठी काँग्रेसनेही कंबर कसली आहे. उशिरा का होईना, पण प्रचारात भाजपासारखी आघाडी घेण्यासाठी काँग्रेसने ‘मास्टर प्लॅन’ आखला. त्याची धुरा ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्याकडे दिली आणि पटेल यांच्या वॉर रुमने दिलेल्या सुचनांनुसार प्रचार केला. शिवाय एक पाऊल पुढे जात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सत्तेत येताच पहिल्या दहा दिवसांत शेतकºयांना कर्जमाफी देण्याची घोषणा करुन ६७ टक्के शेतकरी मतदारांना आपल्या पक्षाचा विचार करण्यास भाग पाडले.दिग्गज नेत्यांसमोर तुलबळ प्रतिस्पर्धी उभा करत काँग्रेस-भाजपाने कुरघोडीचे राजकारण खेळण्याचाही प्रयत्न केला. याची सुरुवात केली ती काँग्रेसने. भाजपाच्या गोटातून बंडखोरी करत बाहेर पडलेल्या मानवेंद्र सिंह यांना मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याविरोधात झालरापाटण मतदारसंघातून तिकिट देण्यात आले. वसुंधरा राजेंनी २०१३ च्या निवडणुकीत ६०९८६ मतांची आघाडी घेत विजय मिळविला होता. तेव्हा राजपूतांचा भाजपाला पाठिंबा होता. मात्र, गुंड आनंदपाल एन्काउंटर प्रकरणात ‘राजे’ सरकारने घेतलेली भूमिका आणि त्यानंतर पद्मावत चित्रपट प्रकरण हाताळण्यात आलेल्या अपयशामुळे राजपूतांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे वसुंधरा राजे यांच्या विरोधात मानवेंद्र यांच्या रुपात राजपूत उमेदवार देऊन काँग्रेसने त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसच्या या खेळीचा बदलाही राजेंनी घेतलाच. ज्या सचिन पायलट यांनी राजेंविरोधात मानवेंद्र यांना उतरविण्याचा निर्णय घेतला, त्यांची वाट बिकट करण्यासाठी वसुंधरा राजे यांनी आपला विश्वासू सरदार युनुस खान यांना टोंक मतदारसंघातून अगदी शेवटच्या क्षणी यादीत फेरबदल करीत तिकिट दिले. टोंक मतदारसंघात मुस्लीम समाजाचे प्राबल्य आहे. मात्र, युनुस खान आणि पायलट या दोघांनाही हा मतदारसंघ नवखा आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाच्या कन्हैयालाल यांनी टोंक मतदारसंघातून प्रतिस्पध्यार्ला ४०,२२१ मतांनी पराभूत केले होते. त्यामुळे पायलट यांना येथे कडवी झुंज मिळू शकते.२०१३ च्या निवडणुकीत एससी-एसटी आणि ओबीसी प्रवगार्साठी राखीव असलेल्या ५९ जागांपैकी ५० जागांवर भाजपाने विजय मिळवला होता. उरलेल्या नऊ जागांवर नॅशनल पीपल्स पार्टी आणि काँग्रेसकडून त्यांना कडवी झुंज मिळाली होती. मात्र यंदा नॅशनल पीपल्स पार्टीचे किरोडीलाल मीणा यांनी आपल्या पक्षाचे भाजपात विलिनिकरण केल्याने भाजपाच्या मार्गातील मोठा अडथळा दूर झाला आहे. असे असले तरी आरक्षणावरून गुर्जर समाज भाजपावर नाराज आहे. त्याशिवाय आदिवासींसाठी २०१३ च्या निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण झाली नसल्याने आदिवासी समाजही भाजपावर नाराज आहे. त्यात बंडखोरीमुळे होणारे मतांचे ध्रुवीकरण भाजपासाठी चिंतेचे कारण आहे. या साºयाचे परिणाम मतदानावर कितपत होतात ते निकाल लागल्यानंतरच समजेल.>...या जागांवर ‘करो या मरो’गेल्या निवडणुकीत काही उमेदवार अगदी ३०० ते७०० मतांच्या फरकाने विजयी झाले होते. त्यातनॅशनल पीपल्स पार्टीचे नवीन पलानिया (अंबर), काँग्रेसचे नारायण सिंह (दंत रामगड), काँग्रेसचेभानवर सिंह (कोलायत), भाजपाच्या भीमा बाई (कुशालगड), नॅशनल पीपल्स पार्टीचे डॉ. किरोडीलाल मीणा (लालसोत), भाजपाच्या अनिता कटारा (सागवारा) यांचा समावेश आहे. मात्र, यंदा या सर्व मतदारसंघात मोठ्या प्रमाणात अपक्षांनी आव्हान निर्माण केल्याने मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जागा कोणत्या पक्षाच्या हातीजातात, याकडेही विश्लेषकांचे लक्ष आहे

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक