CoronaVirus News लस टोचल्यानंतरही कोरोनाची लागण होणार? तेलंगानातील रिपोर्ट चिंता वाढविणारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 10:28 AM2020-08-26T10:28:46+5:302020-08-26T10:29:26+5:30

CoronaVirus कोरोना लसींच्या प्रतिकार शक्तीवरही शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे. य़ा लसी रुग्णामध्ये प्रतिकारशक्ती तयार करतात. अँटीबॉडी तयार करण्याचे काम करतात.

Will CoronaVirus be infected even after vaccination? Report in Telangana raises concerns | CoronaVirus News लस टोचल्यानंतरही कोरोनाची लागण होणार? तेलंगानातील रिपोर्ट चिंता वाढविणारा

CoronaVirus News लस टोचल्यानंतरही कोरोनाची लागण होणार? तेलंगानातील रिपोर्ट चिंता वाढविणारा

Next

एकीकडे सर्व जग कोरोना लस तयार करण्याच्या मागे सारी शक्ती लावत आहे तर दुसरीकडे काही घटनांनी मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यामुळे य़ा लसी किती परिणामकारक ठरतील यावरच शंका उपस्थित होऊ लागली आहे. अशीच काहीशी घटना तेलंगानामध्ये घडली आहे. तेलंगाना सरकारने मंगळवारी सांगितले की राज्यात दोन रुग्ण असे आढळले आहेत की जे बरे झाल्यानंतर पुन्हा कोरोना बाधित झाले आहेत. 


तेलंगानातील हा रिपोर्ट येण्याआधीच एक दिवस हॉन्गकॉन्गच्या संशोधकांनी देखील असाच दावा केला होता. त्यांना एकदा कोरोनातून बरा झालेला रुग्ण पुन्हा पॉझिटिव्ह सापडला होता. तेही हा रुग्ण एप्रिलमध्ये पहिल्यांदा कोरोनाबाधित झाला होता. यानंतर पुन्हा आता ऑगस्टमध्ये तो कोरोनाबाधित झाला आहे. यामुळे एकदा कोरोना झाला आणि तो रुग्ण बरा झाला याचा अर्थ तो कोरोनाविरोधात लढण्यास सक्षम आहे असे होत नाहीय. यामुळे कोरोना लसींच्या प्रतिकार शक्तीवरही शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे. य़ा लसी रुग्णामध्ये प्रतिकारशक्ती तयार करतात. अँटीबॉडी तयार करण्याचे काम करतात.


तेलंगाना सरकारने नागरिकांना सांगितले आहे की, त्यांनी अतिरिक्त सावधगिरी बाळगावी. राज्याचे आरोग्यमंत्री इतेला राजेंदर यांनी सांगितले की, याची कोणतीही गॅरेंटी नाहीय की कोणी व्यक्ती कोरोना संक्रमित होऊन बरा झाला तर त्याला पुन्हा कोरोना होणार नाही. ज्या रुग्णामध्ये अँटिबॉडी विपूल प्रमाणात तयार होत नाही, त्याला पुन्हा कोरोना होण्याचा धोका असतो. 


एका टीव्ही चॅनलशी चर्चा करताना राजेंदर यांनी सांगितले की, आतापर्यंत सापडलेल्या 1 लाख कोरोना रुग्णांमध्ये दोन लोकांनाच पुन्हा कोरोना झाल्याचे समोर आले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोरोनाचा मृत्यूदर खूपच नगण्य आहे. 99 टक्के लोक बरे होत आहेत. 


थंडीत कोरोनाची आधीपेक्षा भयंकर लाट येणार?
चीनमध्ये पसरलेल्या कोरोनाने आतापर्यंत 213 देशांमध्ये कहर माजविण्यास सुरुवात केली आहे. जवळपास 2 कोटी 20 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 8 लाखांहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. कोरोना लस पुढील दोन महिन्यांत येणार आहेत. लस विकसित करणाऱ्यांसाठी एक चांगली बाब म्हणजे कोरोना रुप बदलत नाहीय. 

यामुळे काही तज्ज्ञ हिवाळ्यापर्यंत कोरोनाची लस येण्याचा अंदाज व्यक्त करत आहेत. तर काही तज्ज्ञ कोरोना पावसाळ्यापेक्षा हिवाळ्यात जास्त खतरनाक पद्धतीने पसरणार असल्याचे सांगत आहेत. थंडीमध्ये येणारी कोरोनाची दुसरी लाट पहिल्यापेक्षाही जास्त खतरनाक असू शकते, असे या तज्ज्ञांचे मत आहे. WHO सोबत काम केलेल्या इंफेक्शियस डिसीज एक्सपर्ट क्लाउज स्टोहर यांचा एक लेख 'द प्रिंट'मध्ये छापून आला आहे. या अहवालानुसार कोरोना व्हायरसचे एपिडेमायोलॉजिकल बिहेविअर कोणत्याही अन्य रेस्पिरेटरी डिसीजपासून वेगळे नसते. यामुळे आता सुस्त झालेला व्हायरस थंडीत पुन्हा सक्रीय होऊ शकतो. जगाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून लढण्यासाठी तयार रहायला हवे. कोरोनाची संभाव्य लाट सध्याच्या लाटेपेक्षाही जास्त धोक्याची असू शकते. ब्रिटेनच्या अकादमी ऑण मेडिकल सायन्सचे देखील असेच मत आहे. येथील तज्ज्ञांनुसार 2021 च्या जानेवारी, फेब्रुवारीमध्ये 2020 च्या सुरुवातीला जे हाल होते तसेच असणार आहेत. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

CoronaVirus News: गंभीर इशारा! थंडीत लस अशक्य; पण कोरोनाची दुसरी मोठी लाट येण्याची शक्यता

कौन बनेगा? तुम्ही देखील बनू शकता करोडपती; रोज फक्त 30 रुपये बाजुला काढा

तुमचा पगार किती? 30,000; मोठी योजना घेऊन येतेय मोदी सरकार

Unlock 4.0 : देशाला अनलॉक 4 चे वेध; मेट्रो, विमान, चित्रपटगृहे, शाळा सुरु होणार?

 

Web Title: Will CoronaVirus be infected even after vaccination? Report in Telangana raises concerns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.