- हरीश गुप्तानवी दिल्ली : राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत काही जास्तीच्या जागा मिळविण्यासाठी भाजप विरोधी पक्षांतील आमदारांची शिकार करण्याच्या जोरदार प्रयत्नांत आहे. १७ राज्यांत ५६ जागांसाठी २६ मार्च रोजी निवडणूक होत आहे. भाजपला आपल्या आमदारांच्या संख्याबळावर १४ जागा जिंकता येणार आहेत. परंतु, जास्तीच्या तीन जागा काँग्रेसकडून हिसकावण्यासाठी त्याचे शिकारीचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. हरयाणा आणि महाराष्ट्र वगळता भाजपने जवळपास सगळ््या राज्यांत काँग्रेसचे आमदार जिंकून व विरोधकांच्या मतांत फूट पाडून जागा जिंकता येईल यासाठी एकेक जास्तीचा उमेदवार उभा केला आहे.गुजरातमध्ये भाजपचा जास्तीचा तिसरा उमेदवार जिंकावा यासाठी काँग्रेसच्या पाच आमदारांनी राजीनामे दिले. या शिवाय मध्यप्रदेश आणि राजस्थानातही भाजपने जास्तीचा तिसरा उमेदवार उभा केला आहे. मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसच्या २२ आमदारांनी पक्षाचाच राजीनामा दिल्यामुळे तेथे भाजपचा तिसरा उमेदवार जिंकून येण्याची अपेक्षा आहे. हे २२ आमदार सध्या बंगळुरूत मुक्कामाला आहेत. परंतु, आता भाजपची नजर गुजरात व राजस्थानातील जास्तीचा तिसरा उमेदवार जिंकून आणण्याकडे रोखलेली आहे. राजस्थानात भाजपला तीनपैकी फक्त एक जागा मिळण्याची अपेक्षा आहे. परंतु, आता काँगे्रसकडून दुसरी जागाही हिसकावता येईल अशी त्याला आशा आहे.
विरोधी पक्षाच्या आमदारांची भाजपकडून होणार शिकार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 04:38 IST