विकली राऊंड..... क्राईम गुन्हेगाराचे वय १८
By Admin | Updated: March 8, 2015 00:31 IST2015-03-08T00:31:01+5:302015-03-08T00:31:01+5:30
जिल्ह्यामध्ये खून, दरोडा,हाणामारी, अत्याचार, अपहरण, घरफोडी, दुचाकी चोर, सायकल चोर असे एकामागून एक गुन्हे घडत आहेत. या गुन्ह्यांमधील काही आरोपी जसे सराईत आहेत, तसेच अनेक आरोपी हे तरुण आहेत. त्यांच्या चेहर्याकडे बघितल्यानंतर ते गुन्हेगार असतील, यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही. १८ ते २० वर्षांचे आरोपी पाहून अनेकवेळा पोलिसांचेही हृदय हेलावते. त्यांच्या हातामध्ये बेड्या टाकताना पोलिस आणि न्यायाधिशांच्याही कठोरतेला पाझर फुटत असणार. ज्या वयात शिक्षण घ्यायचे, त्या वयात तरुण मुले जेलची हवा खात तरुणाई स्वत:च्याच कर्माने चिरडून टाकतात. अल्पवयीन मुलांना सुधारगृहात टाकले जाते, मात्र १८ वर्षांच्यावर वय असलेली मुले आपले भविष्य अंधार कोठडीत डांबून ठेवतात. जेथे मिशाही फुटलेल्या नसतात, तिथे गुन्हेगारीच्या अनेक फांद्या पसरट होतात. त्याची मुळेही खो

विकली राऊंड..... क्राईम गुन्हेगाराचे वय १८
ज ल्ह्यामध्ये खून, दरोडा,हाणामारी, अत्याचार, अपहरण, घरफोडी, दुचाकी चोर, सायकल चोर असे एकामागून एक गुन्हे घडत आहेत. या गुन्ह्यांमधील काही आरोपी जसे सराईत आहेत, तसेच अनेक आरोपी हे तरुण आहेत. त्यांच्या चेहर्याकडे बघितल्यानंतर ते गुन्हेगार असतील, यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही. १८ ते २० वर्षांचे आरोपी पाहून अनेकवेळा पोलिसांचेही हृदय हेलावते. त्यांच्या हातामध्ये बेड्या टाकताना पोलिस आणि न्यायाधिशांच्याही कठोरतेला पाझर फुटत असणार. ज्या वयात शिक्षण घ्यायचे, त्या वयात तरुण मुले जेलची हवा खात तरुणाई स्वत:च्याच कर्माने चिरडून टाकतात. अल्पवयीन मुलांना सुधारगृहात टाकले जाते, मात्र १८ वर्षांच्यावर वय असलेली मुले आपले भविष्य अंधार कोठडीत डांबून ठेवतात. जेथे मिशाही फुटलेल्या नसतात, तिथे गुन्हेगारीच्या अनेक फांद्या पसरट होतात. त्याची मुळेही खोलवर रुजतात. खोड कसे तयार होते, याची अनेक कारणे आहेत. घटस्फोट,आई-वडिलांमध्ये आलेला दुरावा, अनाथ मुलांना न मिळालेला आसरा, व्यसनाधिनता, मुलांकडे पालकांचे दुर्लक्ष, पाचवीला पुजलेले दारिद्रय, कमी कष्टात पैसा मिळविण्याचा हव्यास अशी एक ना अनेक कारणे यामध्ये दडलेली आहेत. गुन्हा घडल्यानंतर अशा भावनिक गोष्टींबाबत कायदा कधीच विचार करीत नसतो. गुन्ह्याप्रमाणे शिक्षा होते. मात्र या तरुणांचे पुढे काय ? याचा समाज फारसा विचार करीत नाही. ट्र्रक चालकांना लुटणारी टोळी, वाळू तस्करी, तरुणांचे खून पाडणारे हे कोणी सराईत गुंड नव्हे, तर साधे-सुधे तरूण आहेत. त्यांच्यामध्ये अशी खुनशी वृत्ती का निर्माण होते? याचा विचार करण्यापूर्वीच ते चतुर्भज होतात. आपला तरुण मुलगा कुठे जातो, काय करतो, कोठून पैसे आणतो, घरातून पैसे न देताही तो चैनीच्या वस्तू, मौज-मजा करतो, हे आपल्या मुलांना विचारण्याचे धाडस पालकांमध्ये नसल्यानेच गुन्हेगारीचे वय १८ च्या आत येऊ लागले आहे. यासाठी प्रबोधनापेक्षाही पालकांचा आणि कायद्याचा धाक हवा आहे. गुन्ह्यांचा तपास वेगाने झाला, शिक्षा एक वर्षाच्या आत लागली तरच कायद्याचा आणि पोलिसांचाही धाक निर्माण होईल. पोलिसांची तपास प्रक्रिया वेळकाढू आणि लांबणारी असेल तर एकामागून एक नवे गुन्हेगार तयार होतील. तरुणांच्या टोळ्यांचा पोलिसांनी आधीच बंदोबस्त केला, तरच गुन्हेगारीच्या जाळ्यात तरुण अडकणार नाहीत. गुन्हेगारीपासून परावृत्त करणारी पर्यायी व्यवस्था नसणे जेवढी खेदजनक तेवढीच गंभीर आणि समाजासाठी घातक ठरणार आहे.