सध्या मौजमजेसाठी लोक कोणत्याही थराला जात आहेत. नातेसंबंध, मैत्री आदी सारे विसरून हे लोक एकमेकांच्या पत्नींची अदलाबदल ज्याला वाईफ स्वॅपिंग म्हणतात, ते करत आहेत. असाच एक प्रकार गुन्हेगारीची राजधानी असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये घडला आहे. ज्याने पोलिसही चक्रावले आहेत.
या प्रकरणाची सुरुवात गुजरातच्या अहमदाबादमधून झाली आहे. लोनी कटरा पोलीस ठाणे परिसरात राहणारे लक्ष्मणपूर गावाचे रहिवासी अनुप यादव आणि पप्पू कोरी हे अहमदाबादला नोकरीमुळे वास्तव्याला होते. दोघेही भाड्याने घरे घेऊन आपापल्या पत्नींसोबत राहत होते. काही दिवसांपूर्वी अनुपने आपली पत्नी हरवल्याची तक्रार अहमदाबाद पोलिसांत केली होती. तसेच पप्पू कोरी हा संशयीत असल्याचे सांगत त्यानेच आपल्या पत्नीला पळविल्याचे सांगितले होते.
इकडे अनुपच्या पत्नीने युपीच्या बाराबंकीला पोहोचल्यावर पोलीस स्टेशन गाठत अनुपविरोधात तक्रार नोंदविली. लग्नाला दोन वर्षे झाली आहे, पती मारहाण करतो आणि मला माहेरी सोडून गेला होता. काही दिवसांनी मी जेव्हा परतले तेव्हा त्यांचा मित्र पप्पूसोबत राहण्यासाठी दबाव टाकू लागला. विरोध केल्यावर मारण्याची धमकी दिली आणि आता तुला माझ्या मित्रासोबत त्याची पत्नी बनून रहावे लागेल असे सांगितल्याची ही तक्रार होती.
दोन्ही राज्यांच्या पोलिसांत तक्रार दाखल झाली. चौकशी सुरु झाली तेव्हा पप्पू कोरीला पोलिसांनी चौकशीला बोलावले, त्याने अनुपवर आरोप केले. मी घरी नसताना अनुप सारखा माझ्या घरी येत होता. माझ्या पत्नीला त्याने फुस लावली आणि आपल्यासोबत घेऊन गेला व त्याच्या पत्नीला माझ्याकडे सोडून गेल्याचे सांगितले. पोलिसांना कोण खरे बोलतोय कोण खोटे काहीच समजत नव्हते. दोघेही मित्र, पप्पूनुसार अनुपची पत्नी चार महिन्यांपासून त्याच्यासोबत राहत आहे. तर त्याची पत्नी अनुपची साथ देत आहे. एकंदरीतच पोलिसांना हा प्रकार समजला आणि पोलिसांनी चौघांचेही समुपदेशन करून पत्नींना पुन्हा तक्रार आली तर कारवाई करणार असा दम भरत त्यांच्या त्यांच्या घरी पाठविले आहे.