“शिखर धवनच्या मुलाला पत्नीने भारतात आणावे”; मुलावर आईसह वडिलांचाही अधिकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2023 06:33 IST2023-06-10T06:32:52+5:302023-06-10T06:33:08+5:30
दिल्लीच्या कुटुंब न्यायालयाचा आदेश

“शिखर धवनच्या मुलाला पत्नीने भारतात आणावे”; मुलावर आईसह वडिलांचाही अधिकार
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : क्रिकेटर शिखर धवन याची पत्नी आयशा मुखर्जी हिने आपला नऊ वर्षे वयाचा मुलगा जोरावर याला भारतात घेऊन यावे व त्याची वडिलांशी भेट घालून द्यावी, असा आदेश दिल्लीच्या कुटुंब न्यायालयाने दिला आहे. मुलावर केवळ आईचा नव्हे, तर वडिलांचाही अधिकार असतो, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. धवनपासून वेगळे राहायला लागल्यापासून आयशा जोरावरला घेऊन ऑस्ट्रेलियाला निघून गेली होती.
शिखर धवन जोरावर याला २०२० सालापासून भेटलेले नाहीत. माझी प्रतिमा मलिन करण्याचा आयशा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिखर धवन यांनी याचिकेत केला आहे.
ऑस्ट्रेलियात याचिका
मुलाचा ताबा आपल्याकडेच राहावा यासाठी आयशाने ऑस्ट्रेलियातील न्यायालयात याचिका दाखल केली आहे. जोरावरला भारतात कोणत्या दिवशी घेऊन यायचे याबाबत माझी शिखर धवनशी चर्चा झालेली नाही. याआधी एक तारीख ठरविण्यात आली होती. मात्र, तेव्हा जोरावरची शाळा सुरू होती, असे आयशाने सांगितले.