...म्हणून विक्षिप्त पतीने केलं पत्नीचं टक्कल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 16:26 IST2018-07-04T16:11:53+5:302018-07-04T16:26:37+5:30

उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे

wife refuses to have sex with another guy husband shaves head | ...म्हणून विक्षिप्त पतीने केलं पत्नीचं टक्कल 

...म्हणून विक्षिप्त पतीने केलं पत्नीचं टक्कल 

शाहजहांपूर : उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीने दुसऱ्या व्यक्तीबरोबर सेक्स करण्यास नकार दिल्यामुळे विक्षिप्त पतीने तिचं टक्कल केलंय. या प्रकारानंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे परिसरातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 32 वर्षीय अशोक कुमारचं नऊ वर्षांपूर्वी खुशबू देवी हिच्याबरोबर लग्न झालं. त्यांना दोन मुलंही आहेत. खुशबू काही कामानिमित्त तिच्या बहिणीच्या घरी गेली होती. तिथून रात्री घरी परतल्यानंतर तिने पतीला एका व्यक्तीशी संवाद साधताना पाहिलं. त्याचदरम्यान पतीने त्या व्यक्तीकडून काही पैसेही घेतल्याचंही तिच्या निदर्शनास आलं आणि त्याला घेऊन तो थेट खुशबूच्या खोलीत आला. त्यानंतर अज्ञात व्यक्तीबरोबर सेक्स करण्यासाठी तो पत्नीवर बळजबरी करू लागला. मात्र पत्नीने त्यास नकार दिला. पत्नीच्या नकारामुळे संतापलेल्या पतीने त्याचा बदला घेण्यासाठी चक्क तिचं टक्कल करून टाकलं. खुशबू रात्री झोपेत असताना पतीने त्याच्या भावाच्या मदतीने हे कृत्य केलं आहे. सकाळी उठल्यानंतर खुशबूला डोक्यावर केस नसल्याचं लक्षात येताच तिला धक्का बसला. या संपूर्ण प्रकाराबाबत तिनं मुलांकडे विचारणा केली असता, मुलांनी बाबा आणि काकांनी मिळून हे कृत्य केल्याचं सांगितलं. या प्रकारानंतर तिने पोलिसात धाव घेत पतीविरोधात तक्रार दाखल केली. आरोपी पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
 

Web Title: wife refuses to have sex with another guy husband shaves head

टॅग्स :Arrestअटक