नवर्यानेच घेतला बायकोचा जीव
By admin | Updated: August 2, 2015 22:55 IST
पनवेल : नवीन पनवेल सेक्टर १३ मध्ये राहणार्या गायत्री मिश्रा (४२) या महिलेला नवर्यानेच ठार केल्याची घटना रविवारी घडली. क्षुल्लक भांडणावरून या महिलेला आपला जीव गमवावा लागला.
नवर्यानेच घेतला बायकोचा जीव
पनवेल : नवीन पनवेल सेक्टर १३ मध्ये राहणार्या गायत्री मिश्रा (४२) या महिलेला नवर्यानेच ठार केल्याची घटना रविवारी घडली. क्षुल्लक भांडणावरून या महिलेला आपला जीव गमवावा लागला. नवीन पनवेल सेक्टर १३ मधील ए५/५ येथे राहणार्या मिश्रा दाम्पत्याची नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे भांडणे होत होती. रविवारी स्वयंपाक करत असताना या दोघांमधील भांडण विकोपाला गेले. आरोपी पतीने गायत्रीचे डोके घरातील भिंतीवर जोरात आपटले. त्यात तिचा मृत्यू झाल्याची माहिती खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए. टी. देसाई यांनी दिली. आरोपी जयप्रकाश मिश्राला खांदेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. (प्रतिनिधी)