प्रियकरासोबत मिळून पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट, पुढे.....

By admin | Published: April 24, 2017 06:08 PM2017-04-24T18:08:02+5:302017-04-24T18:08:02+5:30

सात जन्म साथ देण्याचे वचन देणाऱ्या पत्नीनेच प्रियकराच्या साथीने पतीच्या हत्येचे कारस्थान रचून, पतीची हत्या घडवून आणल्याची

Wife murdered by her husband | प्रियकरासोबत मिळून पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट, पुढे.....

प्रियकरासोबत मिळून पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट, पुढे.....

Next
>ऑनलाइन लोकमत
गोरखपूर, दि. 24 -  सात जन्म साथ देण्याचे वचन देणाऱ्या पत्नीनेच प्रियकराच्या साथीने पतीच्या हत्येचे कारस्थान रचून, पतीची हत्या घडवून आणल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथील असून, या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेचा प्रियकर, त्याचे साथीदार आणि महिलेला अटक केली आहे.
गोरखपूरमधील भैरौपूर परिसरात ही घटना घडली आहे.   येथील 32 वर्षीय विवेक उर्फ विक्की सिंगचा विवाह सात वर्षांपूर्वी देवरिया येथील गौरीबाजार परिसरातील सुषामा सिंग हिच्याशी झाला होता. या दोघांनाही सात वर्षांचा एक मुलगाही आहे. मात्र पत्नीच्या  सुषमा हिचे विवाहापूर्वीपासून डब्ल्यू सिंग नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध असल्याची कुणकुण तिच्या पतीला लागली होती. त्यामुळे त्याने पत्नीवर पाळत ठेवली होती.
या प्रकारामुळे वैतागलेल्या पत्नीने आपल्या प्रियकराच्या साथीने पतीच्या हत्येचा कट रचला.  शनिवारी रात्री विवेक आपली पत्नी आणि मुलग्यासह घराच्या छतावर झोपण्यासाठी गेले. त्याचदरम्यान सुषमाचा प्रियकर आणि त्याचे सहकारी घराची भिंत फोडून घरात घुसले. त्यांनी सुषमाच्या मदतीने छत गाठले. तिथे झोपलेल्या विवेकवर विटांनी हल्ला चढवत त्यांनी त्याला ठार केले. 
विवेकचा खून केल्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी हे आरोपी दुचाकीवरून जात होते. त्याचवेळी पहाऱ्यावर असलेल्या पोलिसांनी त्यांना अडवले. नंतर पोलिसांनी विवेकच्या घरी जात त्याची पत्नी आणि प्रियकराला ताब्यात घेतले. त्यानंतर या घटनेचा माहिती मृतकाच्या कुटुंबीयांना देत मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवला.  

Web Title: Wife murdered by her husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.