कर्माचे फळ! सरकारी नोकरी मिळाल्यानंतर पत्नीने पतीला सोडले, पण तक्रारीनंतर नोकरी गेली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 20:09 IST2025-01-23T20:09:00+5:302025-01-23T20:09:27+5:30
सरकारी नोकरी मिळाल्यानंतर पत्नीने पतीला सोडल्याची एक धक्कादायक बातमी समोर आली होती.

कर्माचे फळ! सरकारी नोकरी मिळाल्यानंतर पत्नीने पतीला सोडले, पण तक्रारीनंतर नोकरी गेली
पत्नीला सरकारी नोकरी मिळाल्यानंतर पतीला सोडल्याची एक धक्कादायक बातमी समोर आली होती. या बातमीने राजस्थानमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता. याबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे, पतीने याबाबत पत्नीविरोधात डमी व्यक्तीने परीक्षा पास केल्याची तक्रार दाखल केली होती. आता या तक्रारीवरुन पत्नीला निलंबीत करण्यात आले आहे. राजस्थान येथील कोटा जिल्ह्यातील ही घटना आहे.
'२०१९ मध्ये आरआरबी बोर्ड अजमेरने ग्रुप-डी नोकरीची घोषणा केली होती. पत्नी सपना मीना यांनीही नोकरीसाठी अर्ज केला होता. पत्नीने एका मुलीला डमी उमेदवार म्हणून परीक्षेला बसवले. यामध्ये तिला रेल्वेमध्ये तैनात असलेल्या त्याच्या नातेवाईकाने मदत केली होती, असा दावा पती मनीष मीणा यांनी केला.
वाल्मीक कराडची नवी ऑडिओ क्लीप, पोलीस अधिकाऱ्याशी संभाषण, काय आहे बीड कनेक्शन?
नातेवाईकाच्या मदतीने पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी करण्यात आली. संपूर्ण प्रकरण १५ लाख रुपयांमध्ये मिटवण्यात आले. मी जमिनीवर कर्ज घेऊन ही रक्कम भरली. अर्ज करताना, स्वाक्षरी, फोटो मिक्सिंग करुन घेण्यात आले होते. ही परीक्षा २०२३ मध्ये घेण्यात आली होती.
मनीष मीणा यांनी सांगितले की, सध्या सपना कोटा डीआरएम कार्यालयात काम करत आहे. नोकरी मिळाल्यानंतर ती २५ एप्रिल २०२३ रोजी हरयाणातील सिरसा येथे गेली. तिला येथे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, तिची पहिली पोस्टिंग बिकानेरमध्ये झाली. पण गेल्या वर्षी सपनाची कोटा विभागात बदली झाली आहे, असं त्यांनी सांगितले.
पतीने पत्नीविरोधात केला अर्ज
पतीच्या तक्रारीवरून पत्नीला निलंबित करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणात अनेक रेल्वे अधिकारी सहभागी असल्याचे पती मनीष यांनी तक्रारीत म्हटले आहे. मी या फसवणुकीबाबत दक्षता, पश्चिम मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, भीमगंज मंडी पोलीस स्टेशन आणि कोटा येथील डीआरएम यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
पत्नीवर केली कारवाई
पतीच्या तक्रारीवरून पत्नीला निलंबित करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणात अनेक रेल्वे अधिकारी सहभागी असल्याचे पती मनीष यांनी सांगितले. मी या फसवणुकीबाबत दक्षता, पश्चिम मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, भीमगंज मंडी पोलीस स्टेशन आणि कोटा येथील डीआरएम यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. पण पत्नीला अजून काढून टाकण्यात आलेले नाही, असंही पतीने म्हटले आहे.