शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला लागली हॉटेलमधील जेवणाची चटक, दररोज करून लागली ऑर्डर, पतीने विरोध केल्यावर...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 13:51 IST

Relationship News: ऑनलाईन जेवण मागवण्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. पत्नीला हॉटेलमधून ऑनलाईन जेवण मागवण्याची सवय लागली होती. तर दररोज बाहेरून जेवण मागवण्यास पती विरोध करत होता. पतीने ऑनलाईन जेवण मागवण्यास दिलेल्या नकारामुळे या दोघांमधील वाद एवढा वाढला की प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले.

बदलत्या काळासोबत पती-पत्नीमधील संबंधांमध्येही खूप बदल झाले आहेत. तसेच बऱ्याच पती-पत्नीमध्ये अगदी किरकोळ कारणांवरून तणाव निर्माण होण्याचे प्रमाणही वाढले आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील आग्रा येथून असंच एक अजब प्रकरण समोर आलं आहे. येथे ऑनलाईन जेवण मागवण्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. पत्नीला हॉटेलमधून ऑनलाईन जेवण मागवण्याची सवय लागली होती. तर दररोज बाहेरून जेवण मागवण्यास पती विरोध करत होता. पतीने ऑनलाईन जेवण मागवण्यास दिलेल्या नकारामुळे या दोघांमधील वाद एवढा वाढला की प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले.

ऑनलाईन जेवण मागवण्यावरून झालेल्या वादातून पती-पत्नीमध्ये मारहाणीचा प्रकार घडला. त्यामुळे नाराज झालेली पत्नी माहेरी निघून गेली. एवढंच नाही तर तिने पतीविरोधात पोलिसांमध्ये तक्रारही दिली. त्यानंतर पोलिसांनी ही तक्रार कुटुंब समुपदेशन केंद्राकडे हस्तांतरि केली.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार आग्रा येथे रहणाऱ्या या पती-पत्नीचा विवाह गतवर्षी म्हणजेच २०२४ मध्ये झाला होता. लग्नानंतर काही काळ दोघांमधील नातं सुरळीत सुरू होतं. त्यादरम्यान, एकेदिवशी पतीने हॉटेलमधून जेवणाची ऑर्डर दिली. एकदा बाहेरील खाल्ल्यानंतर पत्नीला या जेवणाची चटक लागली. ती दररोज बाहेरून जेवण मागवण्याचा हट्ट पतीकडे करू लागली.

सुरुवातीला दररोज बाहेरून मागवलेलं जेवण खाणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं, त्यामुळे घरात जेवण बनवत जा असं पतीने पत्नीला समजावून सांगितलं. मात्र पतीच्या या सल्ल्यामुळे ही पपत्नी नाराज झाली. त्यानंतर हॉटेलमधून जेवण मागवण्यावरू पती-पत्नीमध्ये दररोज भांडण होऊ लागलं. एकेदिवशी हा वाद एवढा वाढला की, दोघांमध्ये मारहाणही झाली. त्यानंतर पत्नी रागाने माहेरी निघून गेली. तेव्हापासून मागचे दोन महिने ती माहेरीच आहे. तसेच तिने पतीविरोधात पोलिसांकडे तक्रारही दिली.

दरम्यान, या प्रकरणाचा अंदाज घेतल्यानंतर पोलिसांनी ही तक्रार कुटुंब समुपदेशन केंद्राकडे वर्ग केली. तिथे पती आणि पत्नीचं समुपदेशन करण्यात आलं. पती-पत्नीची समजूत घालण्यात आल्याचं समुपदेशकांनी सांगितलं आहे. रोज बाहेरून जेवण न मागवता घरात जेवण बनवत जा असा सल्ला पत्नीला देण्यात आला. तर कधी कधी हॉटेलमधून जेवण मागवत जा, असा सल्ला पतीला देण्यात आला आहे.  त्यानंतर या सल्ल्यावर दोघांनाही राजी करून त्यांच्यात समुपदेशकांनी सध्यातरी समेट घडवून आणला आहे. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपFamilyपरिवारfoodअन्नUttar Pradeshउत्तर प्रदेश