दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 13:46 IST2026-04-07T13:45:27+5:302026-04-07T13:46:16+5:30

दिल्ली विधानसभेत कार घुसवणाऱ्या सरबजीतने पोलिसांच्या चौकशीत वेगळाच खुलासा केला आहे.

Why was a car driven into the Delhi Assembly? Sarabjit made a shocking revelation during police interrogation! He said.. | दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..

दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..

दिल्ली विधानसभेच्या सुरक्षेला धक्का देणाऱ्या कार घुसखोरी प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. आरोपी सरबजीतने चौकशीत धक्कादायक दावा करत, पोलिसांचे लक्ष वेधण्यासाठीच त्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. हरवलेल्या भाच्याच्या शोधासाठी हा सगळा प्रकार केल्याचा त्याचा दावा आहे.

“भाचा बेपत्ता… कुणी ऐकत नाही”

सरबजीतच्या म्हणण्यानुसार, त्याचा भाचा १ एप्रिलपासून बेपत्ता आहे. या संदर्भात हरिनगर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती. मात्र, या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने तो निराश झाला होता. याच कारणामुळे थेट विधानसभेत घुसून एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत आपली व्यथा पोहोचवण्याचा त्याचा प्रयत्न होता.

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, सरबजीतकडून कोणतेही शस्त्र जप्त करण्यात आलेले नाही. मात्र त्याने स्वतःची कारच हत्यारासारखी वापरली. ही घटना अधिक गंभीर ठरू शकली असती, कारण गाडीमुळे कुणाच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकत होता. त्यामुळे आता त्याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रस्ता माहित नसल्याने ऑटोचालकांची मदत

या घटनेतील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे सरबजीतला दिल्लीतील रस्ते माहिती नव्हते. त्यामुळे त्याने दोन ऑटोचालकांना २००० रुपये देऊन आपल्या गाडीत बसवले आणि मार्गदर्शन करण्यास सांगितले. तो पार्लमेंटला जायचे असल्याचे सांगत होता. मात्र या दोन्ही व्यक्तींचा या कटात सहभाग नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

मानसिक स्थिती ठीक नसल्याचा दावा 

सरबजीतच्या पत्नीने त्याच्या उपचारासंबंधी वैद्यकीय कागदपत्रे पोलिसांना देत, त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे म्हटले आहे. आता त्याच्या मानसिक स्थितीबाबत तपास सुरू असून कॉल रेकॉर्ड्सही तपासले जात आहेत. त्यामुळे या प्रकरणाला नवा वळण मिळण्याची शक्यता आहे.

लॉकअपमध्येही आक्रमक वर्तन

पोलिस सूत्रांनुसार, सरबजीतचे वर्तन अत्यंत आक्रमक आहे. लॉकअपमध्ये तो सतत ओरडत होता, गज हलवत होता आणि विचित्र दावे करत होता. “माझ्याकडे महाराजांची तलवार आहे,” अशा स्वरूपाच्या विधानांनी पोलिसही चक्रावले आहेत. सरबजीतचा वैद्यकीय तपास पूर्ण करण्यात आला असून त्याला लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या घटनेमुळे विधानसभेच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Web Title : दिल्ली विधानसभा कार प्रवेश: पुलिस पूछताछ में सरबजीत का चौंकाने वाला खुलासा

Web Summary : दिल्ली विधानसभा में कार चलाने वाले सरबजीत ने दावा किया कि उसने लापता भतीजे के मामले पर ध्यान आकर्षित करने के लिए ऐसा किया, पुलिस पर निष्क्रियता का आरोप लगाया। उस पर जान जोखिम में डालने के लिए हत्या के प्रयास का आरोप है। पत्नी ने मानसिक अस्थिरता का दावा किया। घटना विधानसभा सुरक्षा पर सवाल उठाती है।

Web Title : Delhi Assembly Car Entry: Sarabjit's Shocking Revelation During Police Inquiry

Web Summary : Sarabjit, who drove a car into the Delhi Assembly, claimed he did it to draw attention to his missing nephew's case, alleging police inaction. He faces attempted murder charges for endangering lives. His wife claims mental instability. The incident raises assembly security concerns.